
कार्यपरिचय
शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर आमदार गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटात सामील झाले. लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वात भाजपला मताधिक्य मिळाले आहे. शिवसेनेचा राज्यातील दमदार चेहरा, मुलुखमैदान तोफ म्हणून लौकिक प्राप्त असून, विरोधकांना अंगावर घेण्याची वृत्ती आहे. पालकमंत्री म्हणून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. कार्यकर्त्यांचे नेटवर्क, संपर्क दांडगा ही त्यांची जमेची बाजू आहे.
उमेदवारीची कारणे :
- शिवसेनेमधील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नेते.
- पालकमंत्री असल्याने इतर मतदारसंघातही विजयासाठी योगदान.
- कार्यकर्त्यांचे जाळे, दांडगा जनसंपर्क.
- मतदारसंघात सर्वत्र विकासकामे केल्याने मतदारांमध्ये प्रभाव.
- मुलूखमैदान तोफ, सभागृहात प्रभावी मांडणी
आव्हाने :
-अनेक वर्षांपासून न सुटलेला धरणगाव शहराचा पाणीप्रश्न
- अनेक वर्षांपासून रखडलेले बालकवींचे स्मारक
- धरणगावातील क्रीडा संकुलाचे बांधकाम
- अनेक वर्षांपासून उद्योगांविना धरणगावची एमआयडीसी
- उद्योग नसल्याने स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न
------------------------
कार्यपरिचय :
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार किशोर पाटील हे शिंदेंसोबत गेले. मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. विकासकामे मोठ्या प्रमाणात केले असून, पक्षांतर्गत कुणीही स्पर्धक नाही, ही जमेची बाजू आहे. विरोधकांना मात देण्याची क्षमता आहे. सलग दोन टर्ममधील प्रभावी काम केल्याने जनतेत दबदबा आहे. किशोर पाटील यांनी सुमारे दोन हजार मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला होता.
उमेदवारीची कारणे :
- मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात विकासकामे.
- रस्ते, मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला.
- सलग दोन टर्मपासून प्रभावी काम.
- कार्यकर्त्यांची तळागाळात मजबूत फळी.
- पक्षांतर्गत कुणीही विरोधक नाही.
आव्हाने :
- आमदार किशोर पाटील शिंदे गटात गेल्याने विरोधकांची टिका.
- बहीण भावातच फूट पडल्याने वैशाली सूर्यवंशींचे किशोर पाटलांसमोर आव्हान
- माजी आमदार दिलीप वाघ यांचीही निवडणूक लढविण्याची तयारी
- अपक्षांची संख्या अधिक असल्याने बहुरंगीच लढत
- अद्यापही कार्यान्वित न झालेली शासकीय ‘एमआयडीसी’
-------------------
कार्यपरिचय :
आमदार चिमणराव पाटील प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. पक्षाने त्यांच्याऐवजी पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. युवा आश्वासक चेहरा व कोरी पाटी असल्याने अमोल पाटील यांचा तरुणांमध्ये प्रभाव आहे. शिवाय, मतदारसंघांत चांगला जनसंपर्क आहे. पित्याची खंबीर साथ लाभल्याने अनुभवाची शिदोरी. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा. विकासकामांसह मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणल्याने फायदा झाला. तसेच पक्षांतर्गत स्पर्धक नसल्याची जमेची बाजू आहे.
उमेदवारीची कारणे :
- आमदार पित्याची खंबीर साथ
- मतदारसंघात चांगला जनसंपर्क
- पक्षांतर्गत पर्यायी स्पर्धक नाही
- युवा, कोरी पाटी असलेला चेहरा
- मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कामे
आव्हाने :
- आमदार पाटील यांनी मुलालाच उमेदवारी दिल्याचा मुद्दा.
- ग्रामीण रस्ते, मूलभूत सुविधा आदी प्रश्न.
- माजी पालकमंत्री पाटील यांच्या लढतीची शक्यता.
- बेरोजगारी, उद्योग उभारणीची गरज
- अपक्षांची वाढती संख्या अडचणीची