District Officer Nitin Mundaware while giving information in a press conference. Neighbor Tehsildar Rupesh Kumar Surana, Police Inspector Vilas Deoreesakal
जळगाव
Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : अमळनेर मतदारसंघात तीन लाखांवर मतदार : प्रांताधिकारी नितीन मुंडावरे
Latest Amalner Vidhan Sabha Election 2024 News : यंदा साहित्य वाटप व मतमोजणी टाकरखेडा रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे, अशी माहिती येथील उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी आज बुधवारी (ता.१६) दुपारी बाराला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली
Amalner Vidhan Sabha Election 2024 : गेल्या एक ऑक्टोबर २०२४पर्यंत १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदाराने येत्या १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज केल्यास त्याला २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळेल. अमळनेर मतदारसंघात तीन लाख सहा हजार ३७० मतदार आहेत. २०१९च्या तुलनेत स्त्री-पुरुष मतदारांचे लिंगगुणोत्तर ९२४ वरून ९५२ वर गेले आहे.
यंदा साहित्य वाटप व मतमोजणी टाकरखेडा रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे, अशी माहिती येथील उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी आज बुधवारी (ता.१६) दुपारी बाराला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Over three lakh voters in Amalner Constituency)