Jalgaon News : मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीत 50 टक्के सवलत! डॉ. नि. तु. पाटील यांचा दहा वर्षांपासून उपक्रम

Jalgaon News : यंदा त्यांच्या वरणगाव वासुदेव नेत्रालयात मतदार जनजागृती अभियान १३ ते २२ मेदरम्यान राबविण्यात येणार आहे.
eye test
eye testesakal

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि. तु. पाटील यांनी मतदान जागृतीसाठी नेत्र तपासणीवर चक्क ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोणत्याही निवडणुकीमध्ये ते हा उपक्रम राबवित आहे. यंदा त्यांच्या वरणगाव वासुदेव नेत्रालयात मतदार जनजागृती अभियान १३ ते २२ मेदरम्यान राबविण्यात येणार आहे. (Jalgaon Voters get 50 percent discount on eye test)

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा, तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नि. तु. पाटील दर निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदार जनजागृती अभियान राबविणार आहेत.

मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्र तपासणी फीमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. १३ मेस मतदान केल्यानंतर हे अभियान १३ ते २२ मेपर्यंत वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी १०० टक्के मतदान होणे गरजेचे आहे. (latest marathi news)

eye test
Jalgaon Lok Sabha: अभिनव संकल्पनांनी सजली मतदान केंद्र! मतदारांना आकर्षिक करण्यासाठी ‘केळीचे आगार’, ‘पर्यावरण पर्यटना’चा लूक

शासन, प्रशासन, सेवाभावी सामाजिक संस्था मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करीत असतात. या लोकशाही उत्सवासाठी आपलाही हातभार लागावा, म्हणून डॉ. पाटील दांपत्य यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे. मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा, म्हणून केवळ बोटावरील शाई दाखविल्यास सवलतीचा फायदा घेता येणार आहे.

"२०१४ पासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, अशा विविध निवडणुकीत हा उपक्रम राबवीत असून, त्यातून सामाजिक भान जोपासण्याचा प्रयत्न असतो. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे."

- डॉ. नि. तु. पाटील, वासुदेव नेत्रालय, वरणगाव

eye test
Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पंरतू..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com