.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon Rain : गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगात संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून, जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील चार गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच वाघूर नदीला एवढा पूर आल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे हतनूर धरणाचे १८ दरवाचे पूर्णत: उघडले असून, त्यातून ९९ हजार क्यूसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापीलाही पूर आला आहे. (Jalgaon Waghur river crosses danger level)