Jalgaon Water Scarcity : पारोळा तालुक्यात टंचाई निवारणार्थ विहिरींचे अधिग्रहण; खेडीढोक गावाला टँकरने पाणीपुरवठा

Jalgaon Water Scarcity : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Workers pouring water into well with help of a tanker.
Workers pouring water into well with help of a tanker.esakal

Jalgaon Water Scarcity : तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, गावपातळीवर पिण्याच्या पाण्याबाबत तालुका प्रशासन ‘अलर्ट’ झाले असून, ६ मार्चपासून खेडीढोक (ता. पारोळा) येथे चार खेपात टँकर सुरू आहे तर हनुमंतखेडे येथील प्रस्ताव अमळनेर उपविभागाकडे पाठविण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Jalgaon water scarcity)

तालुक्यात ११४ खेडी आहेत. दरम्यान, उन्हाळ्यातच काही ठराविक गावांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर काहीवेळ पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता नसते. तालुक्यातील बऱ्याच गावांना कोणताही पाण्याचा स्रोत नसल्यामुळे उन्हाळा सुरू होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासू लागते.

यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत टंचाईग्रस्त भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवून असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन हे गाव पातळीवर संबंधित विभागामार्फत टंचाई परिस्थितीचा आढावा घेत उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करतात.

दरम्यान, पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीत पाणीटंचाईबाबत खेडीढोक येथे टँकरने चार खेपा तर हनुमंतखेडे येथील प्रस्ताव मंजुरीबाबत तर पोपटनगर, शेळावे खुर्द व कराडी येथील विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. (latest marathi news)

Workers pouring water into well with help of a tanker.
Jalgaon News : भुसावळ रेल्वेने एका दिवसात मिळविले साडेतीन कोटीचे उत्पन्न!

सद्यस्थितीत तामसवाडी धरणातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, ज्या गावात पाणीटंचाई भासत असेल, अशा गावांनी पाणी मागणीबाबत पंचायत समिती येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत सर्वत्र पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची मोठी टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले.

बोरी प्रकल्पात २५.२० टक्के पाणीसाठा

तालुक्याला वरदान ठरलेले बोरी धरण यंदा अपूर्ण पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे या धरणात आजच्या स्थितीत २५.२० टक्के पाणीसाठा आहे. तसेच या धरणातूनच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच पारोळा शहराला देखील याच धरणातून पाणीपुरवठा होत असल्यामुळे तालुकावासियांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता त्याची नासाडी होणार नाही किंवा ते वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

Workers pouring water into well with help of a tanker.
Jalgaon Lok Sabha Election: रावेर लोकसभा मतदारसंघावर 3 निवडणूकांपासून भाजपची पकड कायम! 1995 नंतर कॉंग्रेसचा प्रभाव ओसरला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com