Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने जिल्ह्यात मोठी झेप घेतली.
Umed

Umed

sakal

Updated on

- उमेश दंडगव्हाळ

जळगाव - ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने जिल्ह्यात मोठी झेप घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ५५२ स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून तब्बल २ लाख ९९ हजार ३२१ कुटुंबे अभियानाशी जोडली गेली आहेत. बचतगटांच्या माध्यमातून बचत, कर्ज, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय व बाजारपेठेची जोड मिळाल्याने ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला वेग आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com