Jalgaon Women Help Centre: भुसावळ बसस्थानकातील महिला मदत केंद्र बंद! आगारातील पोलिस चौकी धूळखात; प्रवासी सुरक्षेचा बोजवारा

Jalgaon news : या बसस्थानकात महिला व प्रवांशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला मदत केंद्र म्हणून पोलिस चौकीची निर्मित केली आहे. मात्र, ही पोलिस चौकी अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Women Aid Centre
Women Aid Centreesakal

भुसावळ : शहराची देशातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर ऑर्डनन्स फॅक्टरी, आरएमएस यासह अनेक महत्त्वाची केंद्र व राज्य सरकारी कार्यालये येथे आहेत. येथे दररोज लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. त्यामुळे येथील बसस्थानकाला महत्त्व आहे. या बसस्थानकात महिला व प्रवांशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला मदत केंद्र म्हणून पोलिस चौकीची निर्मित केली आहे. मात्र, ही पोलिस चौकी अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पुन्हा पोलिस मदत केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे. (Jalgaon Women help Center at Bhusawal Bus Stand Closed)

भुसावळ बसस्थानकावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानकात महिला मदत केंद्र म्हणून पोलिस चौकी तयार केली आहे. मात्र, ही पोलिस चौकी गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत धुळखात पडून आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे.

प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागांना काहीच घेणे देणे नाही, अशी एकूण परिस्थिती दिसून येत आहे. मोबाइल चोरी, चेन स्नॅचिंग, पाकिटमारी तसेच बॅग लिफ्टिंग अशा विविध समस्यांना तोंड देणाऱ्या प्रवाशांसाठी पोलिसांच्या मदतीची गरज असताना ही चौकी बरेच दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.

रेल्वेस्थानकामुळे मध्यवर्तीय असलेल्या भुसावळ शहराचा विकास वेगाने होत आहे. रोजगाराच्या निमित्ताने मराठवाडा व विदर्भ तसेच उत्तर प्रदेश, बिहार या प्रांतातून मोठ्या संख्येने लोक भुसावळ शहरात येत आहेत. परिणामी दळणवळणाच्या साधनांमध्ये कमालीची वाढ होत आहे. एसटी बसने दररोज लाखो लोक प्रवास करीत असताना त्यांना मोबाइल, चेन स्नॅचिंग, पाकिटमारी व सामानाच्या चोरीच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. (latest marathi news)

Women Aid Centre
Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक

कर्मचाऱ्यांनाच मनस्ताप

सामानाची चोरी झाल्यास त्यांना दूरवर जाऊन पोलिस स्थानक गाठणे कठीण होऊन जाते, किंबहुना तेवढा वेळदेखील नसतो. त्यामुळे अशी चोरी झाल्यास त्यांना सोडून देणे भाग पडते. प्रवाशांबरोबर स्थानिक प्रवाशांनासुद्धा चोरीच्या घटनांनी प्रचंड त्रास होतो. बाहेरगावचे प्रवासी असल्यामुळे त्यांच्या पंचाईत झाल्याच्या घटनांदेखील घडल्या आहेत. अशा वेळेस एसटी कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून त्यांना भाडे करून दिले आहेत. असे कित्येक प्रसंग घडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चोरीच्या वाढत्या घटना

येथील बसस्थानकात अजिंठा, वेरूळ, तसेच संभाजीनगर येथील बिबिका मकबरा, पवनचक्की असे विविध क्षेत्र पाहण्यासाठी देशभरातून प्रवासी येथे येऊन पुढे जातात. त्यामुळे चोरट्यांनी या स्थानकाकडे आपले लक्ष केंद्रित केले असून, सातत्याने चोरीच्या घटना घडत असतात.

Women Aid Centre
Delhi Canada Flight: करत होता गंमत पण आलं अंगलट! विमान उडवण्याची दिली धमकी अन् 12 तास...;13 वर्षाच्या मुलाचा प्रताप आला समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com