यावल : कुपोषित बालकांच्या प्रमाणावरून आरोग्य विभागाच्या कामावर नाराज

कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असतांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या नसल्याची माहीती समोर
आरोग्य विभागाच्या कामावर नाराज
आरोग्य विभागाच्या कामावर नाराजsakal

यावल : तालुक्यात २०१७ -१८या वर्षात  कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असतांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या नसल्याची माहीती समोर आल्यामुळे पंचायतराज समितीने सभागृहात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे २०१७ -१८ या वर्षात तालुक्यात पंचायत समिती कार्यक्षेत्रात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र, व ३४ उपकेंद्र असून या सर्वच केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी भेट दिली नाही.व याच काळात या आरोग्य केंद्रावरील औषधाच्या साठ्याची तपासणीही करण्यात आली नाही. अशी माहीती पंचायत राज समितीसमोर देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पंचायत राज समिती आज येथे आली होती. समितीत आमदार अनिल पाटील यांचे सह आमदार डॉ.देवराव होळी ( गडचिरोली),आमदार माधवराव जवळगावकर ( नांदेड) यांचा समावेश होता. समितीने सर्वप्रथम तालुक्यातील डांभूर्णी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी केली. यावेळी पं.स. सभापती पल्लवी चौधरी, व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले.

आरोग्य विभागाच्या कामावर नाराज
अकोला : ‘आम्ही अकोलेकरांना’ मिळाला केंद्राचा कौशलाचार्य पुरस्कार!

त्यानंतर किनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाची पाहणी केली. वढोदे प्रगणे यावल येथे जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, व सरपंच संदीप सोनवणे यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. येथे पंचायत समितीच्या नविन इमारतीचे सभागृहात पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, व उपसभापती योगेश भंगाळे यांनी समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जि.प. सदस्य रविंद्र पाटील, सविता भालेराव, रामदास पाटील यांनी देखील समिती सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरवात झाली. गटविकास अधिकारी डॉ.एन.एस. पाटील यांनी सन२०१७-१८या वर्षाचा थोडक्यात आढावा दिला. समितीने २०१७ -१८चा आढावा बैठकीत घेतला. यावेळी डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत तालुक्यास दोन आमदार असतांना निधी फारसा मिळाला नसल्याची खंत समितीने व्यक्त केल्याचे समजते.तालुक्यात जेमतेम तीनच कामे सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत झाली आहेत.

आढावा बैठकीत एकूण २८ प्रश्नावली वर उपस्थित अधिकारी वर्गाकडून आढावा घेण्यात आला. बैठकीच्या कामकाजात विधिमंडळ अधिकारी शशिकांत साखरकर,बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, प्रतीवेदक मैत्रेय कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.आढावा बैठकीनंतर तालुक्यातील राजोरा गाव १०० टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याबाबत पंचायतराज समिती प्रमुख आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गिरधर पाटील उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या कामावर नाराज
एफआरपीसाठी रयत क्रांती संघटनेने वेधले भजन आंदोलनाने लक्ष

तालुक्यात वड्री जवळील आसारबारी या आदिवासी पाडयावर आठ महिन्यांचे कुपोषित बालक दगावल्याची घटना घडल्या नंतर संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांविरोधात अद्याप कोठलीही कारवाई न झाल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून उद्याच्या बैठकीत माहीती घेतो असे आश्वासन समिती प्रमुख आमदार अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले.

पंचायतराज समिती सदस्यांच्या वाहनांचा ताफा डांभूर्णी गावात जिल्हा परिषद शाळेची पाहणी करून परतत असतांना दोन वाहने कच्च्या रस्त्याच्या गाळात फसल्याची घटना घडली. काही ग्रामस्थांनी वाहनांना धक्का मारून रुतलेली वाहने गाळातून बाहेर काढली. पंचायतराज समिती सदस्यांयांचे अशा पध्दतीने तालुक्याच्या सीमेवर झालेले स्वागत समिती सदस्य कदापी विसरणार नाही अशी चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com