Jalgaon zilla Dudh Sangh: एकनाथ खडसेंना मोठा धक्का! गिरिष महाजनांनी उधळला विजयाचा गुलाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon zilla Dudh Sangh

Jalgaon zilla Dudh Sangh: एकनाथ खडसेंना मोठा धक्का! गिरिष महाजनांनी उधळला विजयाचा गुलाल

Jalgaon zilla Dudh Sangh Election Result: जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदासाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत खडसे यांचा ‘सहकार’ आणि मंत्री महाजन यांच्या ‘शेतकरी’ पॅनलतर्फे आरोप प्रत्यारोपांचा माईंड गेमही सुरू झाला होता. या दोन्ही गटांची विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दूध संघाच्या कामकाजाबाबत दोन्ही गटांतर्फे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.

हेही वाचा: Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा मोठा निर्णय दिला 'या' सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का बसला आहे.  भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली असून वीस जागांपैकी १६ जागांवर भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर एकनाथ खडसे यांना ५ जागांवर विजयी मिळाला आहे. जवळपास सात वर्षानंतर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने सत्ता मिळवली असून एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. .

हेही वाचा: Maharashtra Politics: ठाकरे गटातील नेत्याकडून शिंदे गटातील आमदाराच कौतुक; चर्चांना उधान

एकनाथ खडसे व आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोप केले होते. जळगाव जिल्हा दूध संघाच्या मतदारांची संख्या केवळ ४४१ असून, या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं जिल्ह्यांच लक्ष लागून होत.

टॅग्स :JalgaonEknath KhadseBjp