भविष्यातील संकटास तोंड देण्यास केमिस्ट बांधवांनी संघटित व्हावे

आप्पासाहेब शिंदे : जिल्हा केमिस्ट संघटनेची सभा
Jalgoan District Chemists Association Meeting
Jalgoan District Chemists Association Meetingsakal

जळगाव : औषधी व्यवसायात कार्पोरेट कंपन्यांचा शिरकाव हा भविष्यातील धोक्याची घंटा आहे. प्रत्येक केमिस्टकडे जावून त्यांना निरनिराळे आमिष दाखवून त्यांच्याकडील ग्राहकांसंबंधी असलेला डाटा ते घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो डेटा ते त्यांच्या व्यवसायात उपयोग करुन भविष्यात तुमचा व्यवसाय बंद पाडण्यास भाग पाडतील. सर्व केमिस्ट बांधवांनी एकजूट राहून पुढील काळात सर्व आवाहनांना तोंड देण्यास सज्ज राहावे, असे आवाहन अखिल भारतीय व राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांनी येथे केले.

जिल्हा मेडिसीन डीलर्स असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा, सत्कार सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. सेंट्रल झोन अध्यक्ष नरेश भगत, खजिनदार देसले, नंदुरबार जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र डागा, धुळे जिल्हा केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष शांतीलाल पाटील, जळगाव जिल्हा सचिव अनिल झंवर, कोषाध्यक्ष शामकांत वाणी, उपाध्यक्ष कनकमल राका, संदीप बेदमुथा, अविनाश महाजन आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, की आपल्या जिल्ह्यातील असलेल्या अधिकृत होलसेलर बांधवांकडूनच माल खरेदी करावा. तरच आपण सर्वजण आपल्या व्यवसायात टिकून राहू. सीसीटीव्ही कॅमेरे हे प्रत्येक औषधी दुकानावर लावणे सक्तीचे केले आहे. ती सक्ती मागे घेण्याबाबत शासन व एफडीए आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

शिंदे यांचा सत्कार

राज्यातील केमिस्टच्या हितासाठी अहोरात्र व सातत्याने झटणारे राज्य संघटनेचे अध्यक्ष शिंदे यांचा सत्कार जिल्हा संघटनेचे ज्येष्ठ सभासद मुरलीधर चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला. औषधी निरीक्षक सोमनाथ मुळे, स्टेट फार्मसी कौन्सिल निवडणुकीत उभे असलेले एमएससीडीए पॅनलचे उमेदवार अतुल अहिरे यांचा सत्कार श्री. शिंदे यांनी केला.

संकटाची सूचना पूर्वीच दिली होती

जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे म्हणाले, की आज जे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. ते अप्पासाहेबांनी वीस वर्षापूर्वीच सांगितले होते. त्याचे गांभीर्य आपण घेतले नाही. परंतु आज जेव्हा ऑनलाईन शॉपी, चेन शॉपी, वेलनेस, नेटमेट सारख्या कंपन्या आपल्या व्यवसायात पदार्पण करीत आहेत हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. या कंपन्यांच्या प्रलोभनाला बळी पडले नाही तरच आपण टिकून राहू. जिल्हाभरातून सुमारे १५०० केमिस्ट बंधू भगिनी उपस्थित होते. सहसचिव श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com