'विज्ञानाचा' उपयोग शेती व्यवसायात करावा

लक्ष्मीकांत साताळकर : चाळीसगावला विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेचे उद्‌घाटन
Jalgoan use science technology farming bussiness
Jalgoan use science technology farming bussinesssakal

चाळीसगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड विद्वत्ता आहे. त्याचा उपयोग त्यांनी विशेषतः शेतीच्या संदर्भात केला तर शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक समृद्ध करणे सोपे होईल. जग झपाट्याने बदलत असल्याने बदलत्या काळाची गरज ओळखून पारंपरिक शेतीला वैज्ञानिकतेची जोड देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी सजगता बाळगावी’, असे आवाहन येथील उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स ॲन्ड के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कै. मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल स्मृतिप्रित्यर्थ २९ व्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन नारायणदास अग्रवाल अध्यक्षस्थानी तर सिनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ. एम. बी. पाटील, ॲड. प्रदीप अहिरराव, राजेंद्र चौधरी, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ. विजय बाविस्कर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. साताळकर यांनी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात कौतुक करुन विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी महाविद्यालयातर्फे राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धेविषयी डॉ. विजय बाविस्कर यांनी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात श्री. अग्रवाल यांनी सध्याचे आधुनिक युग विज्ञानाचे युग आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण व्हावी हा या स्पर्धांचा उद्देश आहे. वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जात असल्याने आणि विज्ञान हे प्रयोगातून सिद्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने घडवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. पूनम निकम व प्रा. मनीषा सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com