
PM Kisan लाभार्थ्यांना KYC पूर्ण करण्यासाठी 31 जुलैची मुदत
जळगाव : शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण केलेले नाही, अशा लाभार्थ्यांना ते पूर्ण करण्यासाठी आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (July 31 deadline for PM Kisan beneficiaries to complete KYC jalgaon Latest Marathi News)
हेही वाचा: विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वापर ; बाळासाहेब थोरात
पात्र लाभार्थी शेतकरी यांना ई-केवायसी करण्यासाठी पुढीलप्रमाणे ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या लाभार्थी शेतकरी यांचा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न केलेला असेल, अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner मधील ई-केवायसी या टॅबमधून ओटीपीद्वारे लाभार्थींना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.
तसेच लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन (सीएससी) बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रांवर बायोमॅट्रिक पद्धतीने केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रतिलाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण पंधरा रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ जुलै अखेरपर्यंत आपले ईकेवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
हेही वाचा: शिवसेनाप्रमुखांच्या मुलाच्या पाठीतच खंजीर : आदित्य ठाकरे
Web Title: July 31 Deadline For Pm Kisan Beneficiaries To Complete Kyc Jalgaon Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..