दरेगाव शिवारात आढळला धुळ्यातील तरुणाचा मृतदेह

दरेगाव शिवारात आढळला धुळ्यातील तरुणाचा मृतदेह; घातपात की अपघात?
death body
death bodydeath body

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : दरेगाव- उपखेड (ता. चाळीसगाव) रस्त्यावर तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी मेहूणबारे पोलीस (Mehunbare police) ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मात्र तरुणाचा घातपात झाला की अपघात? असा प्रश्न निर्माण होत आहे. तरुणाचा मृत्यु लाकडी दांडक्यांवरून दुचाकी घसल्याने डोक्याला (Road accident) मार लागून झाल्याचे पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-daregaon-road-bike-accident-young-boy-death)

सिताणे (ता. धुळे) सुनील शामराव जाधव यांना मंगळवारी रात्री मोबाईलवर फोन आला. त्यात मी राहूल शार्दुल बोलत असून दरेगाव- उपखेड रस्त्यावर एक व्यक्ती मयत स्थितीत पडलेला आहे. त्याला दुखापत झाली असून त्याची मोटारसायकल स्लीप होवून पडली आहे. त्याच्या मोबाईलवर तुमचा नंबर मिळाल्याने कॉल केला. ही माहिती मिळाल्यानंतर सुनील जाधव व गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याठिकाणी प्रविण हिंमत पाटील (रा. सिताणे, ता. जि. धुळे) हा मयत स्थितीत पडलेला होता.

death body
बहिण- भावाचे अपहरण करून लावले कामाला; मुलगी रडल्‍याने प्रकार उघड

लाकडामुळे गाडी घसरली

प्रविण पाटीलच्या मृतदेहाजवळ दुचाकी (एमएच. १८, ए.जी. ६५३१) ही रस्त्यावर पडलेली होती. तसेच तिचा हेडलाईट तुटलेला होता. रस्त्यावर पडलेल्या दोन लाकडांमुळे मोटारसायकल स्लीप झाल्याचे दिसत होते. घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर मयत प्रविण पाटील याचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीवरुन मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यात मयत मोटारसायकल रस्त्यावर पडलेल्या लाकडांमुळे स्लीप होवून डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यु झाल्याचे म्हटले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची भेट

दरेगाव उपखेड रस्त्यावर धुळ्यातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे व सहकाऱ्यांनी धाव घेतली घटनेची माहिती घेतली.

फॉरेन्सिक टीमने घातपाताचा संशय फेटाळला

घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या टीमने घटनास्थळाची सखोल पाहणी केली. त्यात टीमला कुठेही घातपाताचा संशय आढळून आला नसल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com