Jalgaon News : दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Jalgaon News : दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

जळगाव : मेहरूण परिसरातील गायत्रीनगरात दुसऱ्या मजल्यावरून पडून नशिराबाद येथील मजुराचा (Labourer) मृत्यू झाला. शनिवारी (ता. २५) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. (labourer from Nasirabad died after falling from second floor in Gayatri Nagar jalgaon news)

मृतदेह सरकारी रुग्णालयात आल्यावर त्यांच्या मुलाने फोडलेला हंबरडा पाहून लोकांचे मन हेलावले होते. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास बाबुराव महाजन (वय ४२) असे मृत मजुराचे नाव आहे.

ते माळीकाम करणारे ठेकेदार प्रकाश मराठे यांच्याकडे कामाला होते. मराठे यांनी गायत्रीनगरातील एका बंगल्यातील काम घेतले होते. त्यामुळे कैलास महाजन शनिवारी सकाळी तेथे आले. सकाळी अकराच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरून पाय घसरून ते खाली पडले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्यांच्या हाता-पायाला व डोक्याला जबर मार लागल्याने अन्य मजुरांनी त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. झिशान खान यांनी तपासणीअंती महाजन यांना मृत घोषित केले. या वेळी मराठे यांच्यासह महाजन यांच्या नातेवाईकांची रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Jalgaondeathworker