Ladki Bahin Yojana e-KYC
esakal
पारोळा (जळगाव) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील तब्बल सात हजार १८७ महिलांची ‘ई- केवायसी’ चुकली (Ladki Bahin Yojana e-KYC) असल्याची बाब समोर आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना शासनाने मोफत लिंक उपलब्ध करून दिली असून, चुकीची ‘ई- केवायसी’ झालेल्या लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन ‘ई- केवायसी’ पूर्ण करावी, असे आवाहन महिला व बालविकास प्रकल्प विभागाने केले आहे.