esakal | लोकसहभागातून तयार केला तलाव; आणि पिण्याचा, शेतीचा प्रश्न सुटणार

बोलून बातमी शोधा

लोकसहभागातून तयार केला तलाव; आणि पिण्याचा, शेतीचा प्रश्न सुटणार }

शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. कुंझर येथे सुमारे १८ दिवसांपासून नाला खोलीकरणाचे काम सुरू होते.

jalgaon
लोकसहभागातून तयार केला तलाव; आणि पिण्याचा, शेतीचा प्रश्न सुटणार
sakal_logo
By
दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः कुठल्याही चांगल्या कामात लोकसहभाग वाढला तर ते काम किती चांगले व आदर्शवत होऊ शकते, याचा प्रत्यय कुंझर (ता. चाळीसगाव) येथे शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानांतर्गत नाम  फाऊंडेशनमार्फत झालेल्या जलसंधारणाच्या कामातून दिसून येत आहे. या अभियानाला कुंझरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने लोकसहभागातून तयार झालेला तलाव गावाला पाणीदार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्याची महसूल वसुली ६२ टक्के; जळगावसह आठ तालुके ‘रेड झोन’मध्ये
 


अभियानांतर्गत कुंझर गावाला पोकलॅन्ड मशीन देण्यात आले होते. या तलावामुळे भविष्यात ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. कुंझर येथे सुमारे १८ दिवसांपासून नाला खोलीकरणाचे काम सुरू होते. आमदार मंगेश चव्हाण व गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन झाले. भूजल अभियान अंतर्गत कुंझर येथे ४ ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात आले. यासाठी ४ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ४९ हजार रूपये जमा करून डिझेल टाकले. नाला खोलीकरणाच्या या कामामुळे परिसरातील १८ शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या कामासोबतच गावठाण मधील रामबर्डी येथेही गावतलाव करण्यात आला आहे. या दोन्ही कामांसाठी संगणक अभियंता गुणवंत सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सेवा सहयोग आणि वंडरलॅन्ड इंडिया प्रायव्हेड लिमीटेडमार्फत डिझेलसाठी १ लाखाची मदत मिळाली. यातून गाव तलाव तयार केला गेला. या तलावातून २४१ ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. त्यासाठी २८ हजार ६०० रूपये इतका खर्च आला. गावातील साहेबराव चौधरी यांच्या शेताजवळ एक नाला बांध तयार केला गेला. ज्यासाठी त्यांनी ६० हजार रूपये डिझेलसाठी खर्च केले. दोन्ही तलावांचा ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. 

आवर्जून वाचा- ‘व्हर्टिकल गार्डन’साठीचा प्रोत्साहन निधी मिळाला; पण उदासीन मनपा तो खर्च करू नाही शकला* 
 


दोन्ही तलावांच्या कामासाठी रमेश चित्ते (नाशिक), सुनील महाजन (पोलीस मुंबई), रवींद्र कोठावदे (मुंबई उद्योजक), विनोद वाघ (बडोदा) यांनीही आर्थिक सहकार्य केले. तसेच शिवनेरी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, सेवा सहयोग संस्था, वंडरलॅन्ड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड, गुणवंत सोनवणे, भूजल अभियानाची टीम यांचेही योगदान लाभले. या सर्वांचे पाणी समिती कुंझर आणि ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे