
रुग्णांच्या जिवाशी खेळ; रुग्णवाहिका डॉक्टरविना धूळखात
पातोंडा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका दिवसा डॉक्टरविना असल्याने चालक उपलब्ध असूनही रुग्णांच्या उपयोगी येत नाही.
पावरा समाजातील मुलगी सपना बारेला हिला बुधवारी (ता. ९) कापूस वेचताना सर्पदंश झाला. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी आणले असता, डॉ. नेहा देवरे यांनी प्रथमोपचार करून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले.
हेही वाचा: नाशिक : हात चालाखी करत भरदिवसा साडेचार लाखांचे दागिने लंपास
१०८ रुग्णवाहिका टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर पातोंडा येथे रुग्णवाहिका असतानाही डॉक्टरांअभावी अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र, वेळेचे गांभीर्य लक्षात न घेता उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका (एमएच १४, सीएल १०८७) ही अर्ध्या तासानंतर निघाली नाही.
त्यामुळे रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेत कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी विशाल पवार व नेहा देवरे यांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ रुग्णवाहिकेने रुग्ण अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. १०२ रुग्णवाहिका चालक जितू पाटील जेवणाची वेळ झाली असतानाही जेवण न करता कर्तव्याला प्राधान्य दिल्याने ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरले.
Web Title: Laying With Patient Lives Ambulance Dust Without A Doctor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..