जळगावच्या वेशीवर दिसला बिबट्या; पण मृतावस्थेत

भूषण श्रीखंडे
Wednesday, 6 January 2021

बिबट्या हा रस्त्याच्या कडेलाच पडलेला असून त्याच्या नाकातून रक्त, तर तोडांतून जीभ बाहेर आलेली आहे. 

जळगाव ः जळगाव शहरालगत ममुराबाद रस्त्यावरील नांद्रा फाटा येथील रस्त्याच्या कडेला आज एक बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसून आला. त्यामुळे आजूबाजुच्या गावात एकच खळबळ उडाली तर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

आवश्य वाचा- निनावी फोन आला..पत्नीने अत्यंदर्शन घेताच दिसले भयंकर! मग काय मृतदेह स्मशानातून थेट जिल्हा रुग्णालयात

जळगाव शहरापासून काही अंतरावर तसेच ममुराबाद रस्त्यावरील नांद्रा फाटा येथे आज सकाळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला एक धडधाकट बिबट्याचे दर्शन झाले. सुरुवातीला बिबट्या दिसताच अनेकांची भांबेरी उडाली. परंतू हा बिबट्या कोणतीच हालचाल करत नसल्याने काही नागरिकांनी जवळ जावून पाहता बिबट्या हा मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. तत्काळ नागरिकांनी जळगाव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तसेच वन्य जीव संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे , राहुल सोनवणे,दिनेश सपकाळे, रितेश भोई ,प्रसाद सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक नाही

बिबट्या हा रस्त्याच्या कडेलाच पडलेला असून त्याच्या नाकातून रक्त वाहत असल्याचे वन विभागाच्या कर्मचारी तसेच वन्यजीव संरक्षक समितीच्या सदस्यांना दिसले. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक झालेला नसल्याची शंका वर्तवली जात आहे. त्यामुळे शवविच्छेदनाच्या अहवालनंतरच बिबट्याचा मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. 

आवर्जून वाचा- आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांमूळे धुळ्याच्या तरुणाचे वाचले प्राण   

 

बिबट्याचा मृत्यूचे हे कारणे असू शकतात

- गळफास बसल्या मुळे जीभ बाहेर आलेली

- नाकातून रक्त आलेलं

- ओढून आणल्याच्या खुणा नाहीत

- शॉक हे कारण पण असू शकते 

- आजूबाजुच्या शेतात शेतात इलेक्ट्रिक वायर्स नाहीत

- मारून बाहेरून आणून टाकलेला शकतो.

- जबर मार किंवा धडक ही श्यक्यता पण नाकारता येत नाही ,  

बिबट्याचा मानवी वस्तीकडे संचार

जंगलात अन्न पाण्याची कमतरतेमूळे बिबट्यांचा वावर आता जंगल परिसालगतचे गाव तसेच मोठ्या प्रमाणात शेती असलेल्या गावांजवळ बिबट्यांचा वावर आता वाढलेला आहे. गावांजवळ अन्न पाणी मिळत असल्याने बिबट्यांचा गावांजवळ संचार मोठ्या प्रमाणात दिसण्याच्या घटना वाढलेला आहे. परंतू ममुराबद जवळील मृत बिबट्या हा शरिराने सृदुढ असल्याचे दिसून येत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard marathi news jalgaon leopard found dead near city