पारोळ्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने लाॅकडाऊन !

पारोळ्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने लाॅकडाऊन !
Updated on

पारोळा : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पालिकेत नुकतीच प्रशासन व व्यापार्यांची बैठक होवुन आठवड्यातुन सोमवारी जनता कर्फ्यु पाळला जावा.असे सर्वानुमते ठरल्यानुसार  अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपालासह कृषी केंद्र व महामार्गालगतची सर्व दुकाने बंद असल्याने सोमवार बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन याबाबत प्रशासनाकडुन नागरिकांसह व्यापार्यांचे कौतुक होत आहे.

जिल्हयासह इतर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आठ दिवसाची मुदत देत "मी जबाबदार "मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.तसेच कोरोनाचा नवा प्रकार संसर्गजन्य ठरु शकल्याचा इशारा वैद्यकिय सुत्रांनी दिल्याने सर्वत्र अलर्ट राहण्याचा सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी कमी होणे गरजेचे असल्याने आठवड्यातुन एक दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात यावा.असे पालिकेकडुन नगराध्यक्ष करण पाटील व मुख्यधिकारी ज्योती भगत पाटील यांनी व्यापारी महासंघासह व्यापारी बांधवांना आवाहन केले होते.त्या पाश्वभुमीवर आज सर्वच दुकाने बंद ठेवुन सोमवार बंद यशस्वी झाला आहे. यावेळी पालिका कर्मचारीसह पोलिस प्रशासन व महसुल विभाग यांनी करडीनजर ठेवत गर्दी होणार नाही.याबाबत लक्ष केंद्रित केले होते.

आवर्जून वाचा- जळगावमध्ये शाळा बंदबाबत आज होणार निर्णय


महामार्गावर शुकशुकाट
कोरोनाच्या पहील्या लाटेत दर सोमवारी जनता कर्फ्युत पालिका चौकातील दुकानेसह बाजारपेठ दुकाने बंदमध्ये सहभागी होत होती.तर महामार्गावरिल दुकाने सुरु राहत असल्याने यावेळी व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात होती.मात्र आता सोमवार बंदच्या हाकेला महामार्गालगतची दुकाने बंद असल्याने महामार्ग शुकशुकाट दिसुन येत होता. बँक परिसर, कोर्ट आवार,पंचायत समिती याच ठिकाणी लोकांची तुरळक गर्दी दिसुन आली.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com