Parashuram Janmotsav : शोभायात्रेसह उद्‌बोधन सभा; यंदा तीनदिवसीय सोहळा

Lord Parashuram
Lord Parashuram esakal

Parashuram Janmotsav : भगवान परशुराम जन्मोत्सव यंदा १६, २० व २१ एप्रिल, असे (Jalgaon News) तीन दिवस जल्लोषात साजरा होणार आहे.

या तीन दिवसांत उद्‌बोधन सभा, दुचाकी रॅली, रक्तदान शिबिरासह भव्य शोभायात्राही निघेल. जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. (Lord Parshuram Janmotsav will be celebrated for three days on April 16 20 and 21 jalgaon news)

ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत व अन्य सर्व समाजांसाठी प्रेरणादायी दैवत, म्हणून भगवान परशुरामांची ओळख आहे. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त यंदा ब्राह्मण समाजातील विविध संघटनांच्या माध्यमातून कार्यक्रम होणार आहेत.

असे आहेत कार्यक्रम

रविवारी (ता. १६) सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत (स्व.) बवदेव उपाध्याय फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर (स्व.) जनरल अरुण वैद्य (आकाशवाणी चौकात) होणार आहे. सायंकाळी पाचला महाबळमधील छत्रपती संभाजी चौकातून विराट दुचाकी रॅली निघेल. रॅली महाबळ चौक, आकाशवाणी चौक, रिंग रोडमार्गे टॉवरवरून पुष्पलता बेंडाळे चौकातून पांजरापोळ गोशाळेत सांगता होणार आहे.

गुरुवारी (ता. २०) सायंकाळी सहाला चारूदत्त आफळे यांची उद्‌बोधन सभा. ‘आजचा ब्राह्मण समाज दशा व दिशा’ या विषयावर छत्रपती संभाजी सभागृहात त्यांचे व्याख्यान होईल. शनिवारी (ता. २२) सायंकाळी पाचला मंगेश महाराज जोशी, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते परशुराम रथाचे पूजन होऊन शोभायात्रा निघेल.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Lord Parashuram
Ambedkar Jayanti 2023 : सजीव आरास, मिरवणुकांनी गजबजले रस्ते!

शोभायात्रेचे आकर्षण

शोभायात्रेत यंदा समाजातील युवांचा सहभाग असलेले प्रत्येकी ५० ढोलचे तीन भव्य पथके सहभागी होणार आहे. शोभायात्रेत रांगांमध्ये उपस्थित महिला व पुरुषांच्या रांगा समाजाला गौरवान्वित करून समाजाचा बहुमान वाढविणार आहेत. शोभायात्रेत महिलांचा सहभाग मोठ्या उत्साहाने होणार असून, महिला व मुला-मुलींचे भव्य लेझीम पथक व लेझीम पथकातील महिलांचे तलवारबाजी, दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिकांचे विशेष आकर्षण राहणार आहे.

शेकडो हातांचे योगदान

जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी सुमारे ३०० कार्यकर्ते परिश्रम घेत असून, ३०० मुला-मुलींचे ढोल व लेझीम पथक १५ दिवसांपासून सराव करीत आहे. समाजतील सर्व बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने सर्व कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर व महिला प्रकोष्ट प्रमुख मनीषा दायमा यांनी केले आहे.

Lord Parashuram
NDA Exam : ‘एनडीए’साठी पूर्वतयारी महत्त्वाची : निवृत्त ब्रिगेडिअर सावंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com