Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
esakal
जळगाव : केंद्र सरकारने यंदा आठ हजार ६०० रुपये हमीभाव कापसाला दिला आहे. असे असले तरी बागायती कापूस पेरणी सोडली, तर कोरडवाहू कापूस पेरण्यांना अद्याप सुरुवात झाली (Cotton MSP 8600 rupees farmers) नाही. कारण, जून पूर्ण होत आला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही. जर ५ जुलैपर्यंत कोरडवाहू पेरण्या झाल्या तरच ऑक्टोबरमध्ये कापूस हातात येईल, अन् शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेता येईल. दुसरीकडे पावसाअभावी कापसाच्या उत्पादनात १० ते २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.