Jalgaon News : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्जांचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chopra Farmers Cooperative Sugar Factory

Jalgaon News : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्जांचा पाऊस

चोपडा : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत अक्षरशः अर्जांचा पाऊस पडला. यात २१ जागांसाठी १७१ अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिली आहे.

भाडेतत्त्वावर गेलेल्या चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर दिला असला तरी या कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडणार असल्याचे संकेत ‘सकाळ’ने व्यक्त केले होते.

फॉर्म भरण्यासाठी गुरुवारी (ता. १२) शेवटचा दिवस होता. चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी १७१ अर्ज दाखल झाले असून, निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. (Many applications for elections of Chopra Farmers Cooperative Sugar Factory 171 applications filed for 21 seats Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Jalgaon News : कोटींच्या घोषणा, पण खड्ड्यातून सुटकाच नाही

त्यात १५ जागा ऊस उत्पादक मतदारसंघात गटनिहाय उमेदवारी अर्ज असे - गोरगावले १४, अडावद- ११, चहार्डी-१७, हातेड-१७, चोपडा-१६ असे एकूण ७५, महिलांच्या दोन जागांसाठी १९, तसेच बिगर ऊस उत्पादक मतदार संघात (सोसायटी) १५, अनुसूचित जाती, जमाती-१४, भटक्या व विमुक्त जाती जमाती-९ आणि विमाप्र, इतर मागास प्रवर्ग-३९, एकूण ९६ सर्व मतदारसंघ मिळून १७१ अर्ज दाखल झाले आहेत.

यात शुक्रवारी (ता. १३) छाननी आहे. ऊस उत्पादक मतदारसंघात सलग तीन वर्षे कारखान्यास ऊस पुरवठा केला पाहिजे, अशी अट असल्याने अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याचे व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा: Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!