esakal | आशादीप वसतीगृहाच्या मुद्यावर भाजप आमदार आक्रमक, गृहमंत्र्यांनी नेमली चार सदस्‍यीय समिती गठीत

बोलून बातमी शोधा

anil deshmukh}

महिला व मुलींसाठी आश्रयस्‍थान असलेल्‍या या वसतीगृहात धक्‍कादायक प्रकार उघड झाला आहे. विधीमंडळात याचे पडसाद उमटले असून घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्‍तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

आशादीप वसतीगृहाच्या मुद्यावर भाजप आमदार आक्रमक, गृहमंत्र्यांनी नेमली चार सदस्‍यीय समिती गठीत
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : आशादीप महिला वसतीगृहात महिला व मुलींना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याचे पडसाद विधीमंडळात उमटले. विधीमंडळपात प्रश्‍न उपस्‍थित करत भाजप आमदार श्वेता महाले यांनी तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावून त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या प्रकाराबद्दल दोषींवर कारवाईची मागणी करत संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे मागणी केली. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

जळगावातील आशादीप महिला शासकीय वसतिगृह ही संस्था विधवा, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच कुमारी माता, मुली, अनाथ मुलं यांच्यासाठी आश्रयस्‍थान आहे. जळगावात हे वसतीगृह नवीन नसून १९८३ मध्ये वसतिगृहाची स्थापना झाली आहे. तसेच १००६ मध्ये यास आश्रयगृह म्हणून घोषित करण्यात आले. महिला व मुलींसाठी आश्रयस्‍थान असलेल्‍या या वसतीगृहात धक्‍कादायक प्रकार उघड झाला आहे. विधीमंडळात याचे पडसाद उमटले असून घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्‍तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

प्रकरण आहे गंभीर
आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना पोलिसांनी डान्स करायला लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या प्रकाराबाबत सदर महिलांनी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आली. महिलांनी अन्याय, अत्याचार होत असल्याची तक्रार करत रात्री तरुण पैसे घेऊन वसतीगृहात प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी करत कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजप आमदार आक्रमक
आशादीप वसतीगृहाचा मुद्दा भाजपच्या आमदार श्वेता महाले उपस्‍थित करत कारवाईची मागणी केली. याच मुद्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत हे योग्य नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा थेट इशारा दिला. आई बहिणी सुरक्षित नसल्‍याची टीका मुनगंटीवार यांनी केली.