बरोबर आजच्याच दिवशी वर्षभरापुर्वी..; जळगावचा चढता आलेख 

jalgaon corona
jalgaon corona
Updated on

जळगाव : बरोबर वर्षभरापूर्वी २८ मार्चला जळगाव जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. दुसऱ्या दिवशी त्याच्याच संपर्कातील दुसरा रुग्णही आढळून आला. पण लगेचच त्याचा मृत्यू झाला आणि जिल्ह्यातील यंत्रणा हादरली. पुढचे १७ दिवस जिल्ह्यात नवीन रुग्ण नव्हता व पहिला रुग्णही पूर्ण बरा झाला..
पण १७ एप्रिलपासून बाधितांचा आकडा वाढण्याची मालिका सुरू झाली ती थेट सप्टेंबर अखेरपर्यंत... नंतर संसर्ग नियंत्रणात येत असताना फेब्रुवारीच्या मध्यान्हापासून पुन्हा दुसरी लाट आली.. ८२ हजारांवर एकूण रुग्ण, दहा हजारांवर सक्रिय आणि पंधराशेपेक्षा अधिक बळी.. हे भयावह आकडे आता कोरोनासोबतच जगायचंय.. असा संदेश तर देत नाही ना! 

२८ मार्चला पहिला रुग्ण 
गेल्या वर्षातील २०२० ची २८ मार्च हीच ती काळी तारीख, ज्या दिवशी जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे अस्तित्व समोर आले. जळगाव शहरातील मेहरूण भागातील रहिवासी पहिला बाधित आढळून आला. त्या वेळी एवढी दहशत होती की, एकमेव रुग्ण असूनही तो नेमका कुठला, कोठून आला, त्याची प्रवासाची पार्श्वभूमी, बाधित होण्याचा स्त्रोत, तो राहत असलेले ठिकाण, बाहेरगावाहून आल्यानंतर तो आणखी किती ठिकाणी गेला, किती जणांच्या संपर्कात आला या प्रत्येक बारीक गोष्टीची तपासणी करण्यात आली. तो ज्या भागात रहिवासी होता तो एक चौरस किलोमीटरचा परिसर ‘सील’ करण्यात आला.. 

दुसरा रुग्ण; २९ मार्च 
२९ तारखेस दुसरा रुग्ण आढळला, ३१ मार्चला त्याचा मृत्यू झाला आणि १७ एप्रिलपासून वाढत्या रुग्णांसह कोरोनाने मांडलेल्या मृत्यूचे थैमान सुरू झाले. १७ एप्रिलपासून रोज रुग्ण वाढू लागले आणि अवघ्या १५ दिवसांत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५० वर पोचली आणि मृत्यू तब्बल १२. म्हणजे एप्रिलमधील कोरोनाचा मृत्युदर तब्बल २४ टक्के होता. 

असे वाढत गेले रुग्ण 
२ मेनंतरच्या तीन दिवसांत म्हणजे ५ मे २०२० ला रुग्णांचा आकडा दुप्पट होऊन तो १०० वर पोचला आणि नंतरच्या २२ दिवसांत म्हणजे २७ मेस तो आकडा पाचपटीने वाढून ५०० वर पोचला. नंतर टप्प्याटप्प्याने रुग्णवाढ होत गेली आणि मृत्यूचे थैमानही सुरूच राहिले. 

असे गाठले टप्पे 
२८ मार्च २०२० 
पहिला रुग्ण 
मृत्यू : ०० 
 
२९ मार्च २०२० 
रुग्ण : ०२ 
मृत्यू : ०० 

२ एप्रिल २०२० 
रुग्ण : ०२ 
मृत्यू : ०१ 

२ मे २०२० 
रुग्ण : ५० 
मृत्यू : १२ 

५ मे २०२० 
रुग्ण : १००वर 
मृत्यू : १४ 

२७ मे २०२० 
रुग्ण : ५००+ 
मृत्यू : ६४ 

६ जून २०२० 
रुग्ण : १०००+ 
मृत्यू : ११७ 

८ जुलै २०२० 
रुग्ण : ५०००+ 
मृत्यू : ३०१ 

२७ जुलै २०२० 
रुग्ण : १००००+ 
मृत्यू ४६९ 

२० ऑगस्ट २०२० 
रुग्ण : २००००+ 
मृत्यू : ७०० 

१५ सप्टेंबर २०२० 
रुग्ण : ४००००+ 
मृत्यू : १००८ 

७ ऑक्टोबर २०२० 
रुग्ण : ५००००+ 
मृत्यू : १२११ 

११ डिसेंबर २०२० 
रुग्ण : ५५२२२ 
मृत्यू १२९९ 
 
२६ फेब्रुवारी २०२१ 
रुग्ण : ६०१८२ 
मृत्यू : १३८३ 

२६ मार्च २०२१ 
रुग्ण : ८३१६५ 
मृत्यू : १५५४ 

दिवसातील सर्वाधिक 
रुग्ण : २४ मार्च २०२१ : १२२३ 
मृत्यू : ९ सप्टेंबर २०२० : २० 
बरे झालेले : २५ मार्च २०२१ : ९९५ 

संपादन - राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com