
घराबाहेर पडतेवेळी सर्वांना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक कामाच्या ठिकाणी थुंकण्यास पूर्ण पणे बंदी आहे. असे आढळून आल्यास त्यांचेवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
अमळनेर (जळगाव) : सद्यस्थितीत राज्यात सर्वत्र कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याची अंमलबजावणीसाठी अमळनेर शहरात विना मास्क वाल्यांवर कारवाईचा बडगा सुरू केला आहे.
रस्त्यावरून येणााऱ्या जाणाऱ्या नागरीकांसह सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये मालक व ग्राहकांमध्ये तसेच ग्राहकांमधील अंतर कमीत कमी सहा फुटाचे अंतर असणे बंधनकारक आहे. एका वेळेस जास्तीत जास्त पाच व्यक्तींनाच परवानगी दिली पाहिजे. घराबाहेर पडतेवेळी सर्वांना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक कामाच्या ठिकाणी थुंकण्यास पूर्ण पणे बंदी आहे. असे आढळून आल्यास त्यांचेवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यावेळी म्हणाले. अमळनेर तालुक्यातील जनतेने अनावश्यक बाजारात गर्दी करू नये,आवश्यक असल्यास घराबाहेर पडा अन्यथा घरात रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहनही यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी केले.
लग्नसमारंभात तुफान गर्दी
लग्न समारंभ व अंत्यविधी तसेच इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही. अशी बाब आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय चालक नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे आदेश काढण्यात आले आहेत. तरी देखील आज होणाऱ्या सर्वच लग्नांना मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळत आहे.
वाहनांना अडवून तपासणी
बऱ्याच दिवसांपासून लोक बेफिकरीने विना मास्क फिरत होते. मात्र पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या तपासणीने धावपळ उडाली होती. तर बऱ्याच विनामास्क वाल्यांकडुन दंड वसुलही करण्यात आल्याने यामुळे शिस्त पालनाची अंमलबजावणी लोक करतील असेही जाणकार लोकांमध्ये चर्चा होती.
संपादन ः राजेश सोनवणे