esakal | केळी इराकला रवाना; जीआय मानांकन प्राप्‍तला मागणी 

बोलून बातमी शोधा

banana transport}

निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. 

केळी इराकला रवाना; जीआय मानांकन प्राप्‍तला मागणी 
sakal_logo
By
प्रशांत पाटील

तांदलवाडी (जळगाव) : केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातील विशेषत: रावेर तालुक्यात केळी पिकाचे सुमारे २३ हजार हेक्‍टरवर उत्पादन घेतले जाते. सद्य:स्थितीत केळीची मागणी बऱ्यापैकी आहे. परंतु त्यापैकी खूपच कमी केळी इतर देशांत निर्यात केली जातात. निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. 
तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रगतिशील शेतकरी व निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शशांक पाटील यांच्या गटाने केळीसाठीचे जीआय मानांकन प्राप्त केले आहे. जीआय मानांकन प्राप्त पिकांना जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळ व निसर्गराजा ग्लोबल इंडिया प्रोड्यूसर कंपनी यांनी महाजन बनाना यांच्या मदतीने केळीच्या निर्यातीस सुरवात केली आहे. केळी मागणीतील सातत्य उत्पादकांचे मनोबल वाढवणारे आहे. आजमितीला पिलबाग केळीमध्ये चांगल्या प्रतिचा माल तयार होताना दिसून येत आहे. 

जळगाव जिल्ह्यातील केळीला जीआय मानांकन प्राप्त झाले असून, यापुढे केळी निर्यात करताना जीआय लोगो वापरून त्याचा प्रचार व प्रसार करण्यावर शेतकऱ्यांना जास्त भाव कसा मिळेल, याबद्दल आमच्या निसर्गराजा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचा भर राहील. 
- शशांक पाटील, अध्यक्ष, निसर्गराजा बनाना प्रोड्युसर कंपनी, तांदलवाडी 

संपादन ः राजेश सोनवणे