टेक्स्टाइल पार्क प्रकल्प ठरतोय ‘बोलाचाच भात..’

टेक्स्टाइल पार्क प्रकल्प ठरतोय ‘बोलाचाच भात..’
textile park
textile parktextile park

भडगाव (जळगाव) : केंद्राने देशात दहा ठिकाणी टेक्स्टाइल पार्क (Textile park) उभारण्याची घोषणा गेल्या वर्षी केली होती. त्यातील जळगाव येथील नियोजित प्रकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात अन्‌ बोलाचीच कढी’ या उक्तीप्रमाणे असल्याचा अनुभव जिल्हावासीय सध्या घेत आहेत. खरंतर, हा प्रकल्प गिरणा पट्ट्यात (Girna river) झाल्यास २५ हजार रिकाम्या हातांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. (bhadgaon textile park work not progress)

केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतील एक प्रकल्प जळगाव जिल्ह्यात व्हावा, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली होती. प्रकल्पासाठी एक हजार एकरपेक्षा अधिक जमीन भडगाव तालुक्यातील मंजूर एमआयडीसीच्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी व्हावा, यासाठी राज्याने केंद्राला शिफारस करावी, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मात्र, दीड वर्ष होत आले तरी याबाबत एकही पाऊल पुढे सरकलेले नाही. त्याचवेळी, राज्य शासनाने अद्याप शिफारस न केल्याने या प्रकल्पाने कासव गती धरल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला.

textile park
पिक विम्याचा परतावा नाही; जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकऱ्यांची पाठ

कापसाला स्थानिक बाजारपेठ

नगरदेवळा सुतगिरणीच्या ठिकाणी टेक्स्टाइल पार्क झाल्यास गिरणा पट्ट्यासह जिल्ह्यातील २५ हजार रिकाम्या हातांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. टेक्स्टाइल इंडस्ट्रीजला आवश्यक असणारा कच्चा माल जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातही गिरणा पट्ट्यात सार्वाधिक कापसाचा पेरा असतो. दर वर्षी साधारणत: एक कोटी क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पादन येते. स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास कापसाला भावही योग्य मिळेल. त्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राजकीय ताकदीची गरज

राज्यात होणाऱ्या एका टेक्स्टाइल पार्कसाठीचा आवश्यक निधी केंद्र शासन देणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे राज्याने प्रस्ताव दिल्यास या प्रकल्पाला चालना मिळण्यास मदत होईल. मात्र, त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे, तशी मागणीही होत आहे. अर्थात, स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही तसे जोरदार प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केद्रांकडे याबाबत शिफारस करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

textile park
राज्याची सीमाबंदी तरीही परराज्यातून अनधिकृत बियाणांचा पुरवठा

राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे टेक्स्टाइल पार्कचा विषय मागे पडला. मात्र, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नगरदेवळा सूतगिरणी येथे हा प्रकल्प व्हावा, यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. यापूर्वी तसे पत्र दिले आहे.

- किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव

या प्रकल्पासाठी राज्य शासनाची सहमती व जागेची गरज भासणार आहे. नगरदेवळा सुतगीरणीच्या परिसरातील जागा सर्वार्थाने योग्य आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, दीड वर्ष झाले तरी अद्याप राज्य शासनाकडून प्रकल्पासाठी शिफारस मिळालेली नाही.

- उन्मेष पाटील, खासदार, जळगाव

या जमेच्या बाजू

- एक हजार एकरपेक्षा अधिक जागा उपलब्ध

- ५०० मीटरवर १३२ वीज उपकेंद्र

- जमिनीला लागूनच नगरदेवळा रेल्वेस्थानक

- संबंधित जागेलगतच ‘७५३ जे’ राष्ट्रीय महामार्ग

- चार किलोमीटरवर गिरणा नदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com