esakal | मध्य रेल्वेतर्फे ऑटोमोबाईलची विक्रमी वाहतूक; फेब्रुवारीत ३२ रॅक केले लोड
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेतर्फे ऑटोमोबाईलची विक्रमी वाहतूक; फेब्रुवारीत ३२ रॅक केले लोड

भुसावळ विभागातील नाशिक रोड, पुणे विभागातील चिंचवड स्टेशन, सोलापूर विभागातील बाळे स्टेशन व नागपूर विभागातील अजनी स्थानक येथे वाहनांच्या वाहतुकीसाठी लोडिंग सुविधा विकसीत करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेतर्फे ऑटोमोबाईलची विक्रमी वाहतूक; फेब्रुवारीत ३२ रॅक केले लोड

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेने क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) स्थापीत केले. या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात तब्बल ३२ रॅक लोड झाले आहेत. तर यंदाच्या वर्षात १४६ टक्के लोडींगमध्ये वाढ झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

या उपक्रमांत मेसर्स महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, मेसर्स टाटा मोटर्स आणि मेसर्स मारुती उद्योग इत्यादी प्रमुख मोटार वाहन उद्योगांशी कार, पिक-अप व्हॅन, ट्रॅक्टर, जीप इत्यादीच्या वाहतुकी संदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या. मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, पुणे विभागातील चिंचवड स्टेशन, सोलापूर विभागातील बाळे स्टेशन व नागपूर विभागातील अजनी स्थानक येथे वाहनांच्या वाहतुकीसाठी लोडिंग सुविधा विकसीत करण्यात आल्या आहेत.

गतवर्षीपेक्षा तिप्‍पटीने लोडींग
फेब्रुवारी २०२१ मध्ये रेल्वेने ३२ रेक लोड केले आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२० मध्ये १२ रेक लोड केले होते. म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये १६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ऑटोमोबाईलच्या २४६ रेकची लोडिंग झाली आहे तर गतवर्षीच्या याच कालावधीत म्हणजे एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत ११८ रेक लोड झाले. चालू वर्षाच्या लोडिंगमध्ये १४६ टक्क्यांनी वाढ दिसून आली. गेल्या वर्षभरात ऑटोमोबाईलची वाहतूक देशाच्या विविध भागात केली गेली आणि बांगलादेशात निर्यातही केली गेली. रेल्वेच्या या उपक्रमामुळे मौल्यवान इंधनाच्या बचतीसह कार्बन फूटप्रिंटची बचत होते. 

संपादन - राजेश सोनवणे

loading image