ऑनलाइन नोंदणीचा ताप; शहरवासीयांचे लसीकरण ग्रामीण भागात

ऑनलाइन नोंदणीचा ताप; शहरवासीयांचे लसीकरण ग्रामीण भागात
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

भुसावळ (जळगाव) : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर (Vaccination center) मागील काही दिवसांपासून नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन (Covin online registation) करणे अनिवार्य आहे. नागरिकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण देणे बंद आहे. मात्र, स्मार्ट फोन हाताळता येत नसल्याने याचा फटका ग्रामीण नागरिकांना बसत आहे. आमदार संजय सावकारे (MLA Sanjay savkare) यांनी तालुक्यातील किन्ही आणि कठोरा येथील लसीकरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली असता, स्थानिक ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. (bhusawal city people vaccination in rural center)

रजिस्ट्रेशनसाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, हे अॅप सुरू झाल्याचे समजण्यापूर्वीच शहरी भागातील नागरिक नोंदणी करून मोकळे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे या चार लसीकरण केंद्रांवर बहुतांश लसीकरण हे बाहेरच्या व्यक्तीचेच होत असल्याचे पुढे आले आहे. तालुक्यातील बहुतांशी जनतेकडे स्मार्टफोन नाहीत, त्यातही नेटवर्क योग्य मिळत नाही, वयोवृद्ध नागरिकांना स्मार्टफोन व्यवस्थित चालविता येत नाही, कधी-कधी सर्व्हर प्रतिसाद देत नाही, अशा विविध समस्या खेड्यापाड्यात येत असून, नागरिकांनी या सर्व समस्या आमदार सावकारे यांच्याकडे मांडल्या. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना दवंगे, सचिन सोनवणे, उपसरपंच जयंत पाटील, सदस्य दिलीप सुरवाडे, पोलिसपाटील राजेंद्र तायडे, भुसावळ तालुका ग्रामीण सोशल मीडियाप्रमुख सचिन येवले आदी उपस्थित होते.

corona vaccination
खेळता खेळता ओढवला मृत्‍यू; वडिलांना मात्र वेगळाच संशय

ॲपमध्ये सुधारणा करा

स्थानिकांना लस मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. कोरोना वाढू नये, यासाठी लॉकडाउन सुरू असताना शहरातील नागरिक ग्रामीण भागात गर्दी करत आहेत. शहरी भागातील उच्चशिक्षित लोक अॅपवर त्वरित माहिती भरत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना नाव नोंदविण्याची संधीच मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लशीपासून वंचित राहत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळावी, यासाठी अॅपमध्ये सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामीण भागातील नेटवर्कचा विचार करता ऑनलाइन नोंदणीची पद्धत ग्रामीण नागरिकांच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे हा त्रास जनतेला न देता, सर्वांचे लसीकरण करावे. लसीकरण ऑफलाइन पद्धतीने करावे, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

- संजय सावकारे, आमदार, भुसावळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com