सीईओ शिवीगाळ प्रकरणी माजी आमदारांना दिलासा

सीईओ शिवीगाळ प्रकरणी माजी आमदारांना दिलासा
santosh chaudhari
santosh chaudharisantosh chaudhari

भुसावळ (जळगाव) : अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या (Bhusawal palika) पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी (former MLA Santosh choudhary) यांनी शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, 14 रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी चौधरी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. चौधरी यांना या गुन्ह्यात मंगळवारपर्यंत अटक करू नये व पोलिसांना तपासात सहकार्य करावे या अटीवर अंतरीम जामीन मंजूर झाल्यानंतर रविवारी चौधरींनी पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपला जवाब नोंदवला. (bhusawal-palika-matter-Consolation-former-MLA-Santosh-choudhary-in-CEO-abuse-case)

santosh chaudhari
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्‍ला; चाकूने भोसकून मारण्याचा प्रयत्न

पोलीस ठाण्यात जवाब नोंदवल्यानंतर चौधरी हे बाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी चौधरी म्हणाले की, मुख्याधिकार्‍यांना आपण ओळखत नाही, पाहिलेले देखील नाही, राजकीय आकस व दबावपोटी आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून खोट्या गुन्ह्यांना आपण भीक घालत नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी वकील अ‍ॅड.जगदीश जगदीश कापडे, कृउबा सभापती सचिन चौधरी, सतीश घुले, आशिक खान शेरखान आदींची उपस्थिती होती.

मदत मागितल्याने त्या ठिकाणी गेलो

‘त्या’ जागेवर काहींनी बेकायदा कब्जा करून वॉचमन यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व त्यावेळी वॉचमन यांनी आपल्याला मदतीसाठी बोलावल्याने त्यांच्या मदतीसाठी आपण तेथे गेलो व कुणाला मदत करणे म्हणजे कायद्याने गुन्हा नाही, असे चौधरी यांनी सांगितले.

santosh chaudhari
कारची धडक; पोटात गर्भ असलेल्‍या हरीणीचा मृत्‍यू

अतिक्रमणाविरोधात लढा देणार

भुसावळात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून काहींनी या माध्यमातून महिन्याला लाखोंची वसुली सुरू केली आहे. या संदर्भात नगरविकास मंत्र्यांना भेटून अतिक्रमण हटवण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षकांकडून पोलीस संरक्षण घेणार

चौधरी म्हणाले की, आगामी काळात पालिकेच्या निवडणुका असून आपल्याविरोधात राजकीय षडयंत्राद्वारे खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून शासनाची रीतसर फी भरू पोलीस संरक्षण मागणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. शासनाचा कर्मचारी सोबत असला म्हणून खोट्या गुन्ह्यांना आळा बसेल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com