esakal | सुरत मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ; गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या 
sakal

बोलून बातमी शोधा

special train

भचाऊ, समाखीली, अहमदाबाद, वरोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, खारीयार रोड, कांताबाजी, टिटलागढ, बालनगीर, बारगढरोड, संबलपूर, अंगुल, ढेंकनल, भुवनेश्‍वर, खुर्दारोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

सुरत मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ; गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या 

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने गांधीधाम-पुरी, पोरबंदर-सांत्रागाची साप्ताहिक विशेष आणि राजकोट-रेवादरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 
गाडी क्रमांक ०९४९३ डाउन गांधीधाम-पुरी साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी रात्री ११.०५ ला गांधीधाम येथून सुटल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुरीला २.२५ ला पोचणार आहे. गाडी क्रमांक ०९४९४ अप पुरी-गांधी विशेष गाडी १९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी पुरीहून रात्री दहाला सुटल्यानंतर गांधीधामला तिसऱ्या दिवशी ११.२५ ला पोचणार आहे. या गाडीला भचाऊ, समाखीली, अहमदाबाद, वरोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, खारीयार रोड, कांताबाजी, टिटलागढ, बालनगीर, बारगढरोड, संबलपूर, अंगुल, ढेंकनल, भुवनेश्‍वर, खुर्दारोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 

पोरबंदर-सांत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी 
गाडी क्रमांक ०९०९३ डाउन पोरबंदर-सांत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी पोरबंदरहून ९.०५ ला सुटल्यानंतर सांत्रागाचीला तिसऱ्या दिवशी ६.२० ला पोचणार आहे. गाडी क्रमांक ०९०९४ अप सांत्रागाची-पोरबंद विशेष गाडी १८ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी सांत्रागाचीहून ८.१० ला सुटेल आणि पोरबंदरला तिसऱ्या दिवशी १८.३५ ला पोचेल. या गाडीला जाम जोधपूर, उपलेटा, जेटलसार, गोंदल, भक्तिनगर, राजकोट, विरंगम, अहमदाबाद, आनंद, वरोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चांपा, झारसुगुडा, राउलकेला, चक्रधरपूर, पुरुलिया, आद्रा, बंकूरा, मिदनापूर, खरगपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 

सोलापूर-गुवाहाटी-दौंड विशेष ट्रेन 
सोलापूर-गुवाहाटी-दौंड (०१३०७) ही विशेष गाडी ९ एप्रिलला सोलापूर येथून साडेपाचला सुटून गुवाहाटी येथे १२ एप्रिलला रात्री साडेबाराला पोचणार आहे. ०१३०८ ही विशेष गाडी १२ एप्रिलला साडेआठला गुवाहाटी येथून सुटेल आणि दौंड येथे १४ एप्रिलला ९.५० ला पोचणार आहे. या गाडीला दौंड, पुणे, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, दहा शयनयान, सात द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत. संपूर्ण आरक्षित ०१३०७ विशेष गाडीचे विशेष शुल्कासह बुकिंग ९ एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. फक्त कंन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. शिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. 

मुंबई-अमृतसर व पुणे-काझीच्या तारखेत बदल 
रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई-अमृतसर व पुणे-काझीच्या तारखांत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०१०५७ डाउन मुंबई-अमृतसर विशेष गाडी १० ते २० एप्रिलदरम्यान धावणार आहे. गाडी क्रमांक ०१०५८ अप अमृतसर-मुंबई गाडी २३ एलिप्रपासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक ०१२५१ डाउन-पुणे -काझीपेठ गाडी ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक ०१२५२ अप काझीपेठ-पुणे विशेष गाडी २५ एप्रिलपासून सुरू होईल. प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

संपादन- राजेश सोनवणे