तिसऱ्या लाटेचा धोका..मुलांसाठी सुपर स्पेशालिटी बेडची मागणी

तिसऱ्या लाटेचा धोका..लहान मुलांसाठी सुपर स्पेशालिटी बेड निर्माणची मागणी
corona third wave
corona third wavesakal
Updated on

भुसावळ (जळगाव) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (coronavirus third wave) लहान मुलांना होण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी सुपर स्पेशालिटी बेड ग्रामीण रुग्णालयात (Rural hospital super speciality bed) राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ.मयूर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी अनेक विषय मांडले. (bhusawal-shiv-sena-corona-third-wave-Super-speciality-bed-for-small-children)

corona third wave
तिसऱ्या लाटेची तयारी..मोहाडी रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट

आतापर्यंत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ४५ वयांपेक्षा रुग्णांना बाधा व मृत्यू (Corona death) झाले. मात्र आता त्यापेक्षा कमी वयाचे बाधित व मृत्युमुखी पडत आहेत. या तिसऱ्या लाटेत १८ वर्षांपेक्षा कमी असलेल्या युवक, बालकांना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहेत.

या विषयांवर केली चर्चा

केंद्रात ० ते १ या वयोगटातील नवजात बालकांसाठी २० खाटा राखीव ठेवण्यात याव्यात. नवजात बालकांसोबत मातेला स्तनपानसाठी केंद्रावर वेगळा कक्ष असावा. कोरोनाबाधित बालक व युवकांवर उपचाराची एकच पद्धत असावी आणि डॉक्टर व आरोग्‍य कर्मचाऱ्यांना त्यानुसार प्रशिक्षितही करण्यात यावे. बालरोग व इतर तज्ज्ञांचा तातडीने टास्क फोर्सचे गठण करण्यात यावे. संक्रमित बालकांसाठी सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी. या विषयावर चर्चा करण्यात आली.

पालकमंत्र्यांकडे मांडणार भूमिका

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुलांना होण्याची शक्यता असून, या अनुषंगाने उपाय योजनांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे असे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com