ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन; गिरीश महाजनांचे नेतृत्‍व

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन; गिरीश महाजनांचे नेतृत्‍व
jalgaon bjp strike
jalgaon bjp strikesakal

जळगाव : ओबीसी समाजाचे रद्द (OBC Reservation) झालेले राजकीय आरक्षण पुन्हा परत मिळावे; या मागणीसाठी आमदार गिरीश महाजन (BJP leader mlp girish mahajan) यांच्या नेतृत्वात आज भाजपतर्फे जळगावात (Jalgaon bjp) आंदोलन करण्यात आले. (jalgaon-bjp-girish-mahajan-stike-obc-reservation-issue)

jalgaon bjp strike
यंदाही शैक्षणिक कॅलेंडर कोलमडण्याची भीती !

ओबीसीचे राजकीय क्षेत्रातील आरक्षण आघाडी सरकारच्या दुर्लक्ष पणामुळे रद्द झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. हे आरक्षण पुन्हा शासनाने द्यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी (Jalgaon collector office) कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

सरकार विरोधात घोषणा

भाजपतर्फे आंदोलन करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच ओबीसी आरक्षण पुन्हा देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. आमदार गिरीश महाजन म्‍हणाले, की सरकार जनतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. तसेच ओबीसी ना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com