लग्‍नाला केवळ झाले सहाच महिने; पत्‍नीला धमक्‍या देत सोडून दिले माहेरी

torture
torture
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : लग्न होऊन सासरी गेल्यानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नवविवाहितेने माहेरून घर बांधण्यासाठी एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या नऊ जणांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 
देवळी (ता. चाळीसगाव) येथील माहेर असलेल्या २४ वर्षीय तरुणीचा विवाह २३ जुलै २०२० ला लासूर स्टेशन (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील दादासाहेब जाधव याच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून पती दादासाहेब याने ‘तू मला पसंत नाही, माझ्या इच्छेविरुद्ध लग्न केले,’ असे सांगत मारहाण केली. 

वडिलांची परिस्‍थिती गरिबीची
घर बांधण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. मात्र, विवाहितेच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्याने तिने पैसे आणण्यास नकार दिला असता, जोपर्यंत माहेरून एक लाख रुपये आणत नाही, तोपर्यंत घरात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी देत घरातून हाकलून माहेरी सोडून दिले व सासरी नांदण्यास टाळाटाळ करू लागले. 

महिला दक्षता समितीकडे तक्रार
पीडित विवाहितेने जळगावला महिला दक्षता समितीकडे तक्रार अर्ज दिला. विवाहितेने मेहुणबारे पोलिस ठाणे गाठून छळाची तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पती दादासाहेब जाधव, सासरा अशोक जाधव, सासू गंगूबाई जाधव, चुलत सासरा कांतिलाल जाधव, चुलत सासू सुमनबाई जाधव, भीमराव जाधव (सर्व रा. लासूर स्टेशन, ता. गंगापूर), गोविंद जाधव (रा. शेकता), संपत कापसे, ताराबाई कापसे (दोन्ही रा. चिगटगाव, ता. वैजापूर) या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Young Woman's Complaint Triggers Major Probe in Jalgaon
Amar Mahajan inspirational story from Jalgaon
Ganesh Patil
Jalgaon
Marathi News Esakal
www.esakal.com