हॉरर वेबसिरीजचे शूटिंग विद्येच्या मंदिरात

हॉरर वेबसिरीजचे शूटिंग विद्येच्या मंदिरात
horror web series
horror web serieshorror web series

चाळीसगाव (जळगाव) : विद्येचे मंदिर असलेल्या येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये एका हॉरर वेबसिरीजचे (Horror webseries) चित्रीकरण करण्यात आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral) होत आहे. या प्रकारामुळे विशेषतः शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या शाळेच्या संस्कारामुळे आपण घडलो, त्या शाळेमध्ये (School) चित्रित झालेला हा भयपट पाहताना वाईट वाटत असल्याच्या प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत. अशा भयपटाच्या चित्रीकरणासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने परवानगी दिलीच कशी? असा संतप्त प्रश्‍न उपस्थित होत असून, याबद्दल शाळा व्यवस्थापनाने खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. (chalisgaon horror webseries shooting at the primary school)

horror web series
संतापजनक..आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; झोपलेली असताना पिशव्या पेटवून फेकल्‍या अंगावर

शतकोत्तर यशाची परंपरा लाभलेल्या या शाळेमुळेच चाळीसगावचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. मध्यंतरी शाळेच्या इमारतीची झालेली दुरवस्था पाहून माजी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेत लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट केला. त्यामुळे आपल्याला घडवणारी सुसंस्कारीत करणारी शाळा एखाद्या भयपटात पाहिल्यानंतर वाईट वाटणे स्वाभाविक आहे. ज्या बेवसिरीजचे शूटिंग या शाळेत झाले, त्यात प्रेमप्रसंग, हिंसाचार, कामुकता चित्रित झाली आहे. जी शाळेच्या दृष्टीने तरी योग्य नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या विशेषतः माजी विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशा प्रकारच्या शूटिंगला परवानगी दिलीच कोणी? आपण सर्वांनी याबद्दल आवाज उठवला पाहिजे. शैक्षणिक डॉक्युमेंटरी, चित्रपट किंवा मुलांचे ड्रामा यूट्यूब सुरू करावे किंवा शिक्षणविषयक बेवसिरीज तयार करावी. केवळ पाच हजार रुपये घेऊन परवानगी देणे योग्य नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

परवानगी दिली पण..

दरम्यान, या संदर्भात संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांना विचारले असता, आम्ही वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली. मात्र, ही बेवसिरीज हॉरर आहे, हे माहीत नव्हते. ते माहिती असते तर आम्ही शूटिंग करूच दिले नसते, असे त्यांनी सांगितले.

horror web series
‘चोसाका’ भाडेतत्त्वासाठी सर्वपक्षीयांची वज्रमूठ

माजी विद्यार्थी म्हणतात..

व्यवस्थापनाने परवानगी दिलीच कशी?

सारंग कोतकर : एखादी हॉरर वेबसिरीज तयार करायला शाळेची इमारत देणे, हे अशोभनीय आहे. मुले जेव्हा ही वेबसिरीज पाहतील तेव्हा ते काय बोध घेतील. शाळेच्या व्यवस्थापनाने अशा हॉरर वेबसिरीजला परवानगी दिलीच कशी? एखाद्या चांगल्या चित्रपटाचे किंवा ज्यातून काही तरी प्रेरणा घेता येईल, अशा डॉक्युमेंटरीच शूटिंग झाले असते तर बरे वाटले असते.

यापुढे तरी काळजी घ्यावी

राजन वाघ : जे काही झाले ते चुकीचेच आहे. शाळा ही विद्येचे घर असते, हे व्यवस्थापनाला कळू नये याचे आश्‍चर्य वाटते. शाळेची इमारत एखाद्या नाटकाला, सांस्कृतिक कार्यक्रमाला, योगासाधनेसाठी दिली तर काही हरकत नाही. पण एखाद्या भयपटाच्या शूटिंगला शाळा देणे विसंगत वाटते. व्यवस्थापनाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा. आता यापुढे तरी अशी चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.

वेबसिरीजवर बंदी आणावी

सचिन नागरे : ही हॉरर वेबसिरीज पाहिल्यानंतर जी मुले आता शाळेत शिकत आहेत त्यांच्या मनावर काय परिणाम होतील. अशा प्रकारचे चित्रीकरण पाहिल्यानंतर मुले शाळेत यायला घाबरतील. त्यामुळे या वेबसिरीजवरच बंदी आणावी, जेणेकरून शाळेची प्रतिमा मलिन होणार नाही आणि विद्यार्थ्यांवरही विपरीत परिणाम होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com