चोपड्यात लोकसहभागातून ऑक्सिजन प्रकल्प; रोज सव्वा लाख लिटर निर्मिती

चोपड्यात लोकसहभागातून ऑक्सिजन प्रकल्प; रोज सव्वा लाख लिटर निर्मिती
oxygen plant
oxygen plantoxygen plant

चोपडा (जळगाव) : राज्यातीलच नव्हे कदाचित देशातील लोकसहभागातून उभा राहत असलेला हवेतून पहिला ऑक्सिजन (Oxygen plant) निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे. या प्रकल्पात दररोज १ लाख २५ हजार (सव्वा लाख) लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. या प्लांटची सुरवात अक्षय तृतीया आणि रमजान (Ramjan) अशा दुग्धशर्करा मुहूर्तावर हा प्लांट कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी दिली आहे. (chopda sub district hospital oxygen plant)

या प्रकल्पासाठी सुमारे १२ लाखांचा खर्च अपेक्षित होता. आतापर्यंत लोकसहभागातून १० लाख २४ हजार ७३८ रुपयांचा निधी गोळा झाला असून, अजून निधी जमा करण्यात येत आहे. यापूर्वी या पूर्वीही लोकसहभागातून दोन ड्युरा सिलिंडर टॅंक ही लोकसहभागातून देण्यात आले असून, पुन्हा हा १२ लाख रुपयांचा प्रकल्प हाती घेत तो पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. या ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर रुग्णालयातील २० बेडला सुविधा मिळणार आहे. सव्वा लाख लिटर ऑक्सिजन तयार होणार असून, १८ सिलिंडर प्रती दिवस क्षमता असली तरी पूर्ण प्रेशरने तो मिळत असल्याने सध्याच्या वापरातील २१ जंबो सिलिंडरची गरज त्याने भागणार आहे. तसेच वीजपुरवठा खंडीत झाल्यास प्रकल्प जनरेटरवर चालवता येणार आहे. त्यामुळे गरजेच्या काळात अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

oxygen plant
वीज ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा ‘शॉक’; रीडिंग एजन्सीच्या चुकांचा भुर्दंड

पन्नास रूग्‍णांवर उपचार

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात एकाचवेळी ५० रुग्ण उपचार घेऊ शकतील. त्यांना जळगावला हलवण्याची गरज भासणार नाही. याबाबत प्रत्यक्ष कंपनीत जावून उद्योजक राहुल सोनवणे यांनी निरीक्षण करून तो मंजूर केला व उद्या तो चोपडा येथे पोचणार असून, दोन, तीन दिवस ट्रायल घेतल्यावर येत्या अक्षय तृतीया आणि रमजान अशा दुग्धशर्करा मुहूर्तावर तो कार्यान्वित करण्यात येणार आहे.

शेवटच्या घटका अन् दातृत्व..

जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असलेले, व्हेंटिलेटरवर असलेले व अतिशय गरीब परिस्थिती असलेले हनुमंत किसन सोनवणे (हातेड खुर्द) यांनी त्यांच्या श्यामसुंदर व प्रमोद या मुलांना सांगून ऑक्सिजन फ्लांटला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मला मदत करायची आहे, असे सांगितले. त्यांनी १ हजार १११ रुपयांची मदत एस. बी. पाटील यांच्याकडे सुपूर्द केलेत. थोड्या वेळाने मृत्यू होणे दिसत असताना दान करण्याची इच्छा, ही निश्चितच ईश्र्वरी इच्छा आहे..त्यासाठी शब्द नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com