स्तनदा मातांना निकृष्ट आहार

स्तनदा मातांना निकृष्ट आहार
स्तनदा मातांना निकृष्ट आहार

चोपडा (जळगाव) : तालुक्यातील माचला येथील अंगणवाडी केंद्रात श्रद्धा निकम या स्तनदा मातेला निकृष्ट दर्जाचा आहार देण्यात आला असून, पोषण आहारात दिले जाणारे हरभरा, हळद, गहू, मीठ, मसूरडाळ हेदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे स्तनदा माता, गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, तत्काळ निकृष्ट अन्नपदार्थ पुरवठा थांबवावा, असे लेखी पत्र माचले येथील डॉ. रवींद्र वामन निकम यांनी चोपडा येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहे. (jalgaon-news-chopda-taluka-Inferior-diet-for-lactating-mothers)

गरोदर, स्तनदा माता व अंगणवाडीतील बालकांना पूरक पोषण आहार मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत जिल्हा परिषदेला कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो, पण या आहाराला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. बालकांना आहार देताना त्यातील पौष्टिकता प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून देणे बंधनकारक असताना हा नियम धाब्यावर बसविला जात आहे. निकृष्ट आहार बालकांना व त्यांच्या मातांना दिला जात आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील गरोदर माता व तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना कडधान्य वाटप केले जाते. हा आहार अत्यंत निकृष्ट असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त करत शासन हा आहार सुदृढ बनविण्यासाठी वाटप करतात की बालक व गरोदर मातांना जिवंत मारण्यासाठी वाटप करत असल्याचा प्रश्‍न पालकांनी उपस्थित केला आहे.

स्तनदा मातांना निकृष्ट आहार
अडथळा आल्यास अंध व्यक्तींना गॅझेट्सद्वारे लगेच मिळणार माहिती

चवीमध्‍येही आहे फरक

तालुक्यातील ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. तालुक्यात आजही शेकडो कुपोषित बालके आहेत. भारताचे भविष्य मुलांमध्ये असते आणि देशाची पिढी सुदृढ असेल तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. या धोरणातून स्तनदा मातांना शासनाकडून वेळोवेळी बालविकास अधिकाऱ्यांमार्फत धान्याचा पुरवठा केला जात आहे. या पुरवठ्यामध्ये हरभरा, हळद, गहू, मीठ, मसूरडाळ असे पदार्थ वितरित करण्यात येतात. परंतु माचला (ता. चोपडा) या गावातील लाभार्थी श्रद्धा निकम यांच्याकडून उपसरपंच नितीन निकम यांना मिळालेल्या माहितीनुसार हे अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. तसेच चवीमध्येदेखील फरक जाणवत आहे. या अन्नपदार्थाबाबत लवकरात लवकर चौकशी करून स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार थांबविण्याची मागणी डॉ. रवींद्र निकम यांनी लेखी अर्जाद्वारे केली आहे. ग्रामीण भागात पुरवठा होत असलेला पोषण आहार निकृष्ट असल्याची ओरड पालकांनी केली आहे. हा आहार प्रयोगशाळेत तपासणी होणे गरजेचे आहे.

अशा आहाराने पोषण होणार?

गरोदर माता आणि तीन वर्षांपर्यंतची बालके यांची मुळातच रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा परिस्थितीत त्यांना पौष्टिक आहार देणे गरजेचे असते. शासनाकडून कुपोषणमुक्तीसाठी पोषण आहारवाटपाची मोहीम हाती घेतली आहे; परंतु अशा पद्धतीचा निकृष्ट आहार बालकांच्या अथवा गरोदर मातांनी घेतला तर त्यांचे आरोग्य किती पोषक व सुस्थितीत राहील हे न सांगणेच बरे.

पोषण आहारातील हळदीचे पाकीट फोडून बघितले असता अतिशय खराब हळद आढळून आली. २०० ग्रॅम हळदीच्या पाकिटवर ६५ रुपये किंमत आहे. या पाकिटामधील हळद प्रयोगशाळेत तपासणीसाठी त्वरित पाठवावी.

- डॉ. रवींद्र निकम, प्रगतिशील शेतकरी, माचले, ता. चोपडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com