esakal | ‘अनलॉक’बाबत निर्णयासाठी सोमवारची प्रतीक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊनची घोषणा केली.

‘अनलॉक’बाबत निर्णयासाठी सोमवारची प्रतीक्षा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘वीकेन्ड लॉकडाऊन’च्या नावाखाली आठवडाभर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे निर्बंध लादल्यानंतर व्यापाऱ्यांमधून त्यास तीव्र विरोध होत आहे. व्यापारी महासंघाने याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असून ‘अनलॉक’चा निर्णय झाला तरी त्यासाठी आता सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊनची घोषणा केली. ‘वीकेन्ड लॉकडाऊन’च्या नावाखाली आठवडाभर जीवनावश्‍यक वस्तू व मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या या आदेशाविरुद्ध व्यापारी रस्त्यावर उतरु लागले. 

जळगावातहूनही विरोध 
व्यापारी महासंघाची जळगाव शाखा म्हणून जिल्हा व्यापारी महामंडळाने या निर्णयास विरोध केला असून मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी राज्य व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर चर्चा केली. या चर्चेत व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याची ग्वाही देत सूचना केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करु, असे सांगितल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

सोमवारपर्यंत थांबू 
दरम्यान, यासंदर्भात जळगावातील पदाधिकारी पुरुषोत्तम टावरी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, काल सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. जीवनावश्‍यक वस्तू, अत्यावश्‍यक सेवांच्या ठिकाणी गर्दी होत असताना अन्य व्यावसायिकांबाबत अन्यायकारक धोरण का? असा प्रश्‍न व्यापारी उपस्थित करत आहेत. सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्याची हमी व्यापाऱ्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेतली असून शुक्रवारपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. जरी निर्णय झाला तरी .‘वीकेन्ड लॉकडाऊन’अंतर्गत शनिवार, रविवारी सर्व बंद असल्याने दुकानांच्या सुरु करण्याबाबत निर्णयासाठी सोमवारपर्यंत थांबावे लागेल. निर्णय काय होता, त्यावर व्यापारी महासंघ भूमिका ठरवेल, असे टावरी म्हणाले. 
 

loading image