संचारबंदीत बाहेर फिरताय..मग रस्‍त्‍यावरच थांबवून होणार कोरोना टेस्‍ट; जळगाव पोलिसांचा ॲक्‍शन मोड 

rapid antigen test
rapid antigen test
Updated on

जळगाव : एकीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १४ एप्रिलच्या रात्रीपासून कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. शिवाय,  रात्रीची संचारबंदी यापुर्वीच लागू आहे. तरी देखील अनेकजण कारण नसताना बाहेर फिरतात. या पार्श्वभुमीवर जळगाव शहरात रात्रीच्या वेळी रस्‍त्‍यावरून फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्‍ट करण्यास सुरवात केली आहे.

कोरोनाच्या वाढत्‍या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्यात आजपासून (१४ एप्रिल) रात्री आठपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आजपासून पंधरा दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून रात्री घराबाहेर पडण्यावरही निर्बंध होते. तरी देखील घराबाहेर पडणारे नागरिक सर्रासपणे रस्‍त्‍यावरून फिरताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते. पोलिसांनी यावर शक्कल लढवली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार संचारबंदीच्या काळात जे नागरिक रस्त्या बाहेर फिरत असतील अशांची त्याच ठिकाणी रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

भुसावळ अन्‌ जळगावमध्ये ॲक्‍शन मोड
संचारबंदीच्या काळात बाहेर निघणाऱ्यांवर अंकूश लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही नामी शक्‍कल लढविली आहे. याची सुरवात जळगाव शहर आणि भुसावळमध्ये करण्यात आली आहे. नगरपालिकेतील पालिकेतील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावतीने शहरातील अष्टभुजा चौकामध्ये संचारबंदीच्या कालावधीमध्ये नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट केली जात आहे. तसेच जळगाव शहरातील काव्यरत्‍नावली चौकात रात्रीच्या वेळी असलेल्‍या प्रत्‍येक नागरीकाची टेस्‍ट करण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे स्‍वतः उपस्‍थित होते.

पॉझिटीव्‍ह आल्‍यास तेथूनच विलगीकरण कक्षात
रस्‍त्‍यावर तपासणी केल्‍यानंतर कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये भरती केले जाणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील आणि इतरांना त्यांच्यापासून प्रसार होणार नाही; हा मुख्य उद्देश आहे. मंगवाळी रात्री उशिरापर्यंत ५० जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये कुणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. 

डॉ. मुंडेंच्या दोन्ही भुमिका
जळगाव पोलीस अ‍ॅक्शनमध्ये आले आहेत. पोलिसांनी सरप्राईज अँटीजेन चाचणी सुरू केली असून शहरातील चौकातून जाणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. यात स्वतः एसपी डॉ. प्रवीण मुंढे उपस्थित राहत असून ते स्वतः डॉक्टर असून त्यांनी देखील नागरिकांची कोरोना चाचणी केली. अर्थात डॉ. मुंडे यांनी दोन्ही भुमिका बजावल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com