esakal | जळगाव जिल्ह्यात होणार ४० लाखांवर लसीकरण  
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccinations

जिल्ह्यात सात केंद्रांवर लसीकरण होईल. त्यात जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शिवाजीनगरातील जैन रुग्णालय, चोपडा, जामनेर उपजिल्हा रुग्णालय, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयांत लसीकरण होईल. 

जळगाव जिल्ह्यात होणार ४० लाखांवर लसीकरण  

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात शनिवार (ता. १६)पासून कोविड लसीकरणास सुरवात होत आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लसीकरणाचा प्रारंभ झाल्यानंतर अकराला जिल्ह्यात लसीकरणास सुरवात होईल. सुरवातीस आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफला लसीकरण होईल. नंतर महसूल, पोलिस क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
जिल्ह्यात सात केंद्रांवर लसीकरण होईल. त्यात जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शिवाजीनगरातील जैन रुग्णालय, चोपडा, जामनेर उपजिल्हा रुग्णालय, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयांत लसीकरण होईल. 
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २४ हजार ३२० लसींचे डोस आले आहेत. वरील केंद्रांवर आठवड्यातून चार दिवस, दररोज शंभर जणांना लसीकरण होईल. लसीकरणापूर्वी संबंधितांची आरेाग्य तपासणी होईल. त्याची ओळख पटवून आधारकार्डाची तपासणी होईल. त्याची माहिती संगणकावर फीड करून नंतर संबंधितांना लसीकरण होईल. अर्धा तास लस दिलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल. जिल्ह्यात जसजशा लसी उपलब्ध होतील तसतशी लसीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत. किमान वर्षभर लसीकरण सुरू राहील. 
 
‘कोविन’ ॲपद्वारे एसएमएस 
आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीची माहिती ‘कोविन ॲप’वर आम्ही फीड केली आहे. या ॲपद्वारेच संबंधितांना लसीकरणाबाबत एसएमएस पाठविला जातो. हा मेसेज एक दिवस अगोदर संबंधितांना कळविला जाणार आहे. त्यात लसीकरण कोणत्या दिवशी, ठिकाणी, वेळी होणार आहे याची माहिती असते. लस दिल्यांनतर पुन्हा डोस केव्हा दिला जाईल त्याची तारीखही कळविली जाणार आहे. 
 
कंट्रोल रूमची निर्मिती 
कोविड लसीकरणावर नियंत्रणासाठी किंवा कोणाला लसीकरणानंतर साइड इफेक्ट झाल्यास त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण नियंत्रण कक्ष सरू केला आहे. त्यांचा क्रमांक २२२६६११ असा आहे. स्तनदा माता, लसीकरणानंतर नाकातून रक्त बाहेर येणाऱ्या व्यक्ती, ज्यांची इम्युनिटी अधिक आहे किंवा (एचआयव्हीग्रस्त) यांना लसीकरण केले जाणार नाही.  

संपादन ः राजेश सोनवणे