esakal | अठरा ते ४४ वयोगटातील लसीकरण; जळगाव शहरात पाच सेंटर

बोलून बातमी शोधा

vaccination
अठरा ते ४४ वयोगटातील लसीकरण; जळगाव शहरात पाच सेंटर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : शहरात अठरा ते ४४ वयोगटातील युवकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. सुरवातीस पाच केंद्रावर लसीकरण सुरू असून काल (ता.१) ४५९ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. जशजशा लशी येतील तसतशी या वयोगटासाठी लसीकरण केंद्रे वाढविली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली. या वयोगटासाठी ७ हजार ५०० लसी जिल्ह्यास उपलब्ध झाल्या आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. पहिल्‍या टप्प्यात ६० वर्षावरील नागरीकांचे लसीकरण झाल्‍यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर आता १८ वर्षावरील सर्वांचेच लसीकरण करण्यास सुरवात झाली आहे. याकरीता नोंदणी करणे करावी लागणार आहे.

याठिकाणी आहेत केंद्र

शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, पोलिस मल्टीपर्पज हॉल, महापालिकेची नानीबाई रग्णालय, शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन या केंदावर १८ ते ४४ वयोगटातील युवकांना लसीकरण केले जात आहेत. लसीकरणासाठी नागरिकांना कोविन ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यांना लसीकरणाबाबत मेसेज आल्यानंतरच लसीकरण होणार आहे.

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील संख्या खूप मोठी आहे. त्याप्रमाणात लसीची उपलब्धता कमी होते. एकादाची लसींची उपलब्धता झाली की जिल्ह्यात सर्व ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू होतील. सर्वांना लस मिळेल. युवकांनी गर्दी करू नये.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक