जळगाव जिल्‍ह्‍यात प्रत्‍येक कुटुंबांचे होणार सर्व्हेक्षण

जळगाव जिल्‍ह्‍यात प्रत्‍येक कुटुंबांचे होणार सर्व्हेक्षण
corona sarvay
corona sarvaycorona sarvay

जळगाव : कोविडचा प्रादुर्भाव रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण मोहिम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.

कोविड विषाणूच्या प्रादुर्भाव झालेल्या बाधित रुग्णांचे लवकर निदान झाल्यास त्यांच्यावर लवकर उपचार करून रुग्णांचे प्राण वाचविता येते. त्यांचे विलगीकरण केल्यामुळे त्यांच्यापासून इतर व्यक्तींना होणारा संसर्गसुध्दा टाळता येतो. कोविड विषाणूच्या पहिल्या लाटेमध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी जावून कुटुंबाचे सर्वेक्षण केले होते. या मोहिमेमुळे जिल्ह्यात लक्षणे असलेले व बाधित रुग्ण शोधण्यात मदत झाली होते. परिणामी पहिल्या टप्प्यातील साथ आटोक्यात आणण्यास या मोहिमेचा प्रभावी उपयोग झाला आहे. याच धर्तीवर कोविडची साथ आटोक्यात आणण्यासाठी नाशिक विभागात २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत सर्वेक्षण मोहिम राबविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

लवकर निदान, लवकर उपचार

‘लवकर निदान, लवकर उपचार’ यानुसार जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेत संशयित रुग्ण शोधणे तसेच कोमॉर्बिड रूग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. मोहिमेद्वारे दररोज झालेल्या सर्वेक्षणाची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून ‘लवकर निदान, लवकर उपचार’ हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

साखळी खंडीत करता येणे शक्‍य

जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ करावी. जेणेकरून कोरोनाची लक्षणे असलेल्या सर्व व्यक्ती या सर्वेक्षणातून शोधण्यात मदत होऊन कोरोनाची साखळी खंडीत करता येईल. या मोहिमेतंर्गत घरोघरी येणाऱ्या तपासणी पथकांना सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com