कोरोनोशी दोन हात पुन्हा करायचे आहेत, साथ द्या 

corona fight
corona fight
Updated on

जळगाव : जिल्ह्यात नागरिकांनी कोरोना संसर्ग होवू नये यासाठी तयार केलेले नियम पाळले नसल्याने कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मे, जून महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. जिल्हा आता उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहे. उद्रेक होवू द्यायचा नसेल, पुनहा लाकडाउन करू द्यायचा नसेल तर सर्वांनी कोरोनोचे नियम पाळा, आपल्याला पून्हा कोरोनोशी दोन हात करायचे आहे. ही लढाइ पून्हा जिंकायची आहे, त्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी असे भावनात्मक आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज फेसबूकद्वारे केले. 
जिल्‍हाधिकारी म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण सध्या ७८० च्या जवळपास आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हीटीचा रेट १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. धोका वाढलेला आहे. गतवर्षी जशी एप्रिल, मे, जूनमध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढली होती तशी आता वाढत आहे. जिल्ह्यातील बंद केलेली सर्व सीसीसी, डीसीएचसी, डीएससी सेंटर सूरू करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी ऑक्सीजन, औषधांचा साठा वाढविण्यात आला आहे. 
 
संशयितांचा शोध सुरू 
आपण सर्व्हेक्षण मोहीम सुरू केली आहे. सोबतच खासगी डॉक्टर, पॅथेलॉजी लॅब यांच्याकडूनही संशयित रुग्णांची माहिती जमा करीत आहेत. त्या रुग्णांना ट्रॅक करून त्यांच्यावर तातडीने उपचार करीत आहेत. 
 
बेफिकिरी खपवून घेणार नाही 
दिवाळीनंतर बाधीतांची संख्या घटली होती. मात्र आता नागरिकांची बेफीकिरी वाढली आहे. गर्दीत जाणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळले गेल्याने बाधीतांची संख्याही वाढत आहे. यापूढे बेफीकिरी खपवून घेतली जाणार नाही. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आज ४५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 
 
लग्नात फक्त ५० जणच हवेत 
लग्न समारंभात केवळ पन्नास लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. तेथे नियमांचे पालन होते किंवा नाही हे तपासणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहे. 
 
घाबरू नका समोर या
कोरोना झाला तर घाबरू नका. समोर या. लवकर उपचार केले तर बरे व्हाल. लक्षणे कमी असतील तर घरी आयसोलेशचा पर्याय उपलब्ध आहे. कोरोनोशी लढण्याची दुसरी वेळ आहे. साथ द्या, नियमांचे पालन करा. अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com