esakal | लॉकडाउनचा संभ्रम..दिवसभर दुकाने बंद सुरूचा खेळ

बोलून बातमी शोधा

jalgaon market

राज्य शासनाने रविवारी आदेश काढून अत्यावश्‍यक दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंदचे आदेश काढले होते. त्यावर जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार जळगाव जिल्ह्यात काय बंद आणि काय सुरू राहणार?

लॉकडाउनचा संभ्रम..दिवसभर दुकाने बंद सुरूचा खेळ
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : शहरात सकाळपासून विविध ठिकाणची व्यापारी संकुले, एकल दुकानांत दुकाने बंद..बंद..दुकाने सुरू..सुरू..पून्हा बंद.. बंद..सुरू.. सुरू.. असा खेळ दिवसभर सुरू होता. 
राज्य शासनाने रविवारी आदेश काढून अत्यावश्‍यक दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंदचे आदेश काढले होते. त्यावर जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार जळगाव जिल्ह्यात काय बंद आणि काय सुरू राहणार? याचे सोमवारी (ता.५) आदेश काढणे गरजेचे होते. मात्र त्याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने व्यापारी, नागरिकांमध्ये तर्कविर्तकांना आज ऊत आला होता. आज पासून ‘ब्रेक दि चेन’ची अंमलबजावणी झालीच नाही. सर्व प्रकारची दुकाने सुरू होती. 

पोलिस आले पण
गोलाणी मार्केटसह, फुले मार्केट, दाणा बाजार, सराफ बाजार यासह विविध ठिकाणची व्यापारी संकूलात आज सकाळी अनेकांनी दुकाने सुरू केली. मात्र पोलिस येवून त्यांनी दूकाने बंद करण्यास सांगितली. दुकाने बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले नसल्याचे सांगताच. पोलिसांनी येतील आदेश तुम्ही दुकाने बंद ठेवा असे सांगत पुढे रवाना झाले. ते रवाना होताच दुकानदारांनी दुकाने सुरू केली. असा खेळ सिंधी कॉलनी, महाबळ कॉलनी, गणेश कॉलनी, पिंप्राळा, मेहरूणसह शहरातील अनेक ठिकाणच्या बाजारपेठात पहावयास मिळाला. 

अर्धे शटर उघडून दुकानाबाहेर
पोलिस आल्याचे कोणी सांगताच दुकाने बंद होत होती. ते गेल्याचे कळताच दुकाने सुरू होत होती. यात नागरिकांची तारांबळ उडत होती. व्यापारी बांधव आपल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू असल्याबाबत विचारणा करीत होते. ‘काय सुरू काय बंद, केवळ शनिवार, रविवार बंद इतर दिवशी सुरू, फक्त अत्यावश्‍यक वस्तूंची दूकानेच सुरू इतर बंद असा’ संवाद व्यापारी, नागरिकांमध्ये रंगला होता. जिल्हाधिकाऱ्यांचेही बंदच आदेश पोलिसांकडे नसल्याने त्यांनीही बंद विषयाकडे कानाडोळा केला होता. 
सराफ बाजारासह सर्वच दुकाने सुरू असल्याने ब्रेक दि चेन’चा पहिला दिवस तर्कविर्तकांनी गाजला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दूपारी दोनपर्यंत बंद बाबत सूस्पष्ट आदेश काढलेले नव्हते. 

संपादन- राजेश सोनवणे