esakal | आदेशाची प्रतिक्षा; जळगावात किराणा दुकाने सुरू ठेवण्याबाबत दिवसभर संभ्रम

बोलून बातमी शोधा

jalgaon kirana stor
आदेशाची प्रतिक्षा; जळगावात किराणा दुकाने सुरू ठेवण्याबाबत दिवसभर संभ्रम
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : राज्य शासनाने किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवण्याचा घेतला आहे. मात्र त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अद्याप आदेश दिलेले नाही. काल घेतलेल्या वरील निर्णयामुळे आज शहरासह जिल्ह्यातील अनेक व्यापारी बांधवांना प्रश्‍न पडला की दुकाने ७ ते ११ सुरू ठेवायची की पूर्ण दिवस सुरू ठेवायची. यामुळे आज दिवसभर व्यापाऱ्यांचा गोंधळ उडाला होता. जो-तो आपापल्या इतर जिल्ह्यतील व्यापाऱ्यांना फोन लावून तिकडील परिस्थितीचा आढावा घेत होते. दरम्यान किराणा दुकाने ७ ते ११ दरम्यानच सुरू ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाला अद्यापपर्यंत आदेश प्राप्त झालेले नसल्याचे सांगणयात आले.

शहरातील रामांनद नगर, महाबळ कॉलनी, पिंप्राळा उपनगर, मेहरूण व शहरातील काही भागात आज व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने ९ ला उघडली. मात्र कालच्या बातमीने दुकाने ११ पर्यंतच सुरू ठेवायची की दिवसभर? याप्रश्‍नाने व्यापारी काळजीत होते. येथील व्यापाऱ्यांनी दुकाने अकरा नंतर बंद केली होती. काहीनीं व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना फोन लावून बंदबाबत विचारणा करीत होते. काहींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातही दुरध्वनी करून किराणा दुकानांची वेळ जाणून घेतली.

किराणा व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवावीत

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने किराणा दुकानासह भाजीपाला व इतर अत्यावश्यक सेवांचा वेळ सकाळी ७ ते ११ निश्चित केला आहे. राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणतेही आदेश काढण्यात आले नाही. राज्य शासनाचे आदेश प्राप्त होत नाही तोवर जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशांचे पालन करण्यात यावे. त्यावश्यक सेवेतील आस्थापना सर्व व्यापाऱ्यांनी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवाव्यात.

व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी म्‍हणतात..

जळगाव महापालिका अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली असून पोलीस प्रशासनाला देखील कळविण्यात आले आहे. सर्व किराणा दुकानदार, अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापना कोरोना संदर्भात असलेल्या नियमांचे पालन करून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत सुरू ठेवाव्यात, असे दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पगारिया यांनी केले आहे.

संपादन- राजेश सोनवणे