esakal | दोन दिवसानंतर बाधित पुन्हा हजारच्या टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon new corona patients

Untitled May 05, 2021 08:37 PM

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी बरे होणाऱ्यांचा आकडा नव्या रुग्णांपेक्षा अधिक आढळून येत आहे. बुधवारी ९९९ नवे रुग्ण आढळून आले तर १०३७ रुग्ण बरे झाले. १८ जणांचा दिवसभरात बळी गेला. (coronavirus spread positive patient figer up again after two days)

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढत नसून आकडा स्थिर आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नव्या रुग्णांचा आकडा हजाराच्या आत आहे. सलग पाचव्या दिवशी असेच आकडे समोर आले. नव्या ९९९ रुग्णांसह बुधवारी जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख २६ हजार ४५३वर पोचली. तर १०३७ रुग्ण बरे झाले, बरे होणाऱ्यांचा आकडा आता १ लाख १४ हजार ४६९ झाला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव रुग्णही कमी होऊन आता ९ हजार ७१२वर पोचलेत. बुधवारी आरटीपीसीआर व एन्टीजेन अशा एकूण ११ हजार १११ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात ७१ हजार लशी उपलब्ध; थांबलेले लसीकरण उद्यापासून

१८ जणांचा बळी

बुधवारी प्राप्त अहवालानुसार तिशीतील तरुणासह १८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यापैकी ४ रुग्ण पाचोऱ्या तालुक्यातील होते. एकूण बळींचा आकडा २२७२ झाला आहे. नॉन-कोविड, सारी, कोविड पश्‍चात व्याधींनी १२ जणांचा बळी गेला.

अमळनेरात संसर्ग वाढला

एकीकडे जळगाव शहरातील रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत असताना ग्रामीण भागात संसर्ग कायम आहे. अमळनेर तालुक्यात १४७ रुग्ण आढळून आले. तर भुसावळ तालुक्यातही १३६ रुग्णांची नोंद झाली.

अन्य ठिकाणचे रुग्ण असे : जळगाव शहर १६०, जळगाव ग्रामीण ३२, चोपडा १५, पाचोरा ६०, भडगाव २६, धरणगाव १७, यावल २६, एरंडोल ६०, जामनेर ४९, रावेर ५९, पारोळा ३२, चाळीसगाव ८२, मुक्ताईनगर ६१, बोदवड २०, अन्य जिल्ह्यातील १८.