अन्यथा १५ दिवसांनी जळगावात पुन्हा लॉकडाउनचे संकेत

अन्यथा १५ दिवसांनी जळगावात पुन्हा लॉकडाउनचे संकेत
jalgaon market crowd
jalgaon market crowdsakal

जळगाव : शहरात सध्या सर्वच दुकाने सुरू करण्यात आली आहेत. सकाळी ७ ते २ अशी वेळ दुकानांची आहे. कोरोना निर्बंधामुळे (Coronavirus lockdown) गेल्या अडीच महिन्यापासून ही दुकाने बंद होती. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे नूकसान होवू नये यासाठी सर्वच दूकानांना नियमांचे पालन करीत असाल तरच १५ दिवस दूकाने (Jalgaon lockdown) सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पंधरा दिवसात जर कोरोना बाधीतांची संख्या पून्हा वाढली, आयसीयू बेड ४० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक राहिले तर पून्हा सर्व दुकाने (अत्यावश्‍यक सोडून) बंद करण्याची वेळ येवू शकते. (jalgaon-coronavirus-unlock-market-crowd-again-jalgaon-lockdown)

दुकाने अडीच महिन्यांपासून बंद असलयाने जो-तो उठतो कारण नसताना बाजारपेठांमध्ये गर्दी करतो. स्वतःची वाहनेही बाजाराच्या रस्त्यावरच उभी केली जातात. सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट, दाणा बाजार, गोलाणी मार्केट, नवीपेठेत दूपारी दोनपर्यंत (Jalgaon market crowd) पाय ठेवायला जागा नसते. वाहनांची गर्दी वेगळीच. या गर्दीतूनच कोरोनाचा प्रसार व प्रचार होतो. ‘तोंडाला मास्क लावा, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्स पाळा, सॅनिटायझरचा वापर करा’ आदी नियम आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी केवळ २० टक्के लोक करताना दिसतात. इतर काहीच नियम पाळत नाहीत. मात्र हीच बेफिकीरी आपल्याला कोरोनाच्या खाईत लोटते. हे विसरता येणार नाही.

jalgaon market crowd
एकाच महिन्यात २८ हजारापेक्षा जास्त गुन्हे दाखल; ४३ लाखाचा दंड

तर जीवावर बेतू शकते

व्यापारी अडीच महिन्याचा तोटा आपल्याला लवकरात लवकर कसा काढता येईल या घाईगर्दीत आहेत. तर ग्राहक आपल्याला खरेदी करावयाच्या वस्तूंसाठी गर्दीत जायला लागेल तरी चालेल मात्र वस्तू घेवूनच असा पावित्र घेतलेला दिसून येत आहे. मात्र कोरोना निर्बंधाचे पालन न करणे हे जीवावर बेतू शकते. सोबतच सुरू असलेला व्यापारही बंदी पडू शकतो, हे व्यापाऱ्यांनी व ग्राहकांनी विसरता कामा नये, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लसीकरण किती जणांनी केले?

व्यापार सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दूकानातील ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरण करून घेणे सक्तीचे आहे, ज्यांचे वय ४४ आतील आहे अशांची दर पंधरा दिवसांनी ॲन्टीजन टेस्ट करणे व तयाचा रिपोर्ट जवळ ठेवणे गरजेचे आहे. मात्र किती व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करू घेतले आहे ? किती जणांची ॲन्टीजन टेस्ट केली आहे ? याचा शोध महापालिकेने घेवून कारवाई अपेक्षीत आहे.

सर्व व्यापारी बांधवांनी ४५ वर्षावरील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. जे ४४ वयोगटाच्या आतील असतील, त्यांची ॲन्टिजेन चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवावा. महापालिकेचे कर्मचारी केव्हाही तपासणी करून अहवाल मागू शकतील.

- रमेश मताणी, अध्यक्ष, सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com