जळगावातील सक्रिय रुग्णसंख्या ९ हजारांच्या आत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corona update

जळगावातील सक्रिय रुग्णसंख्या ९ हजारांच्या आत

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दोन महिन्यानंतर प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजारांच्या आत आली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४१० नवे रुग्ण आढळून आले, तर ७५६ बरे झाले. दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात या महिन्याच्या सुरवातीपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत ४१० नवे रुग्ण समोर आले. एकूण रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार ५४६ झाली आहे. तर ७५६ रुग्ण दिवसभरात बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडाही १ लाख २६ हजार २८९वर पोचला आहे. रिकव्हरी रेट आता ९२ टक्क्यांपर्यंत आहे. गेल्या २४ तासांत ९ रुग्णांचा मृत्यू झाला, एकूण बळींचा आकडा २४६९ झाला आहे. सारी, नॉन कोविड, न्युमोनिया आदी आजारांनी ४ रुग्ण दगावले.

पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांवर

जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही चार टक्क्यांच्या आत आला आहे. शुक्रवारी ३५९१ आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेनच्या ७३२२ अशा एकूण १० हजार ९१३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ४१० रुग्ण आढळले, हा पॉझिटिव्हीटी रेट ३.७५ टक्के ,एवढा कमी आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ३०, जळगाव ग्रामीण १९, भुसावळ २७, अमळनेर २६, चोपडा ४२, पाचोरा ३५, भडगाव ५, धरणगाव १४, यावल ५, एरंडोल ३, जामनेर ४४, रावेर २२, पारोळा १०, चाळीसगाव ४८, मुक्ताईनगर ४३, बोदवड २४.

loading image
go to top