esakal | धक्कादायक.. जिल्ह्यात रुग्णसंख्येचा उद्रेक; एकाच दिवसात ७७२ बाधित 

बोलून बातमी शोधा

corona}

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांनी तर चार-पाचशेचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी मोठा उद्रेक होऊन दिवसभरात ७७२ नवे रुग्ण समोर आले,

धक्कादायक.. जिल्ह्यात रुग्णसंख्येचा उद्रेक; एकाच दिवसात ७७२ बाधित 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. गुरुवारी साडेपाचशे रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी तीव्रता वाढून ७७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. जळगाव शहरातही साडेतीनशे रुग्ण समोर आले असून जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ रुग्णांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. 
जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांनी तर चार-पाचशेचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी मोठा उद्रेक होऊन दिवसभरात ७७२ नवे रुग्ण समोर आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६३ हजार ४२२वर पोचली आहे. तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. दिवसभरात २४६ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५७ हजार ८९५ झाला आहे. रुग्णसंख्या वाढताना आज प्राप्त चाचण्यांच्या अहवालांचा आकडाही मोठा होता. ७७२ पॉझिटिव्ह रुग्ण जवळपास ३६११ चाचण्यांमधून समोर आले आहेत. 

बळींची संख्या चौदाशेवर 
शुक्रवारी जिल्ह्यात आणखी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात जळगाव शहरातील ६६ व ६९ वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील ६१ वर्षीय व धरणगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या मृत्युंमुळे बळींचा आकडा १४०१वर गेला आहे. 

जळगाव शहर रेड झोन 
जळगाव शहरातील संसर्ग तीव्रतेने वाढत आहे. गुरुवारी अडीचशेवर रुग्ण समोर आल्यानंतर शुक्रवारी तर आतापर्यंतची विक्रमी म्हणजे तब्बल ३५९ रुग्णांची नोंद एकट्या जळगाव शहरात झाली. भुसावळ तालुका ६४, जळगाव ग्रामीण २३, अमळनेर १९, चोपडा १०६, पाचोरा व भडगाव प्रत्येकी २, धरणगाव २४, यावल १७, एरंडोल ४८, जामनेर १४, रावेर ३, पारोळा १५, चाळीसगाव ५१, मुक्ताईनगर १८, बोदवड ६ असे रुग्ण आढळले.