esakal | चिंता वाढतेय..जळगाव जिल्ह्यात दिवसभरात तब्बल पाच मृत्यू 

बोलून बातमी शोधा

corona}

३३६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण आकडा ६२ हजार १०२ झाला आहे. दिवसभरात १५२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्यांची संख्या ५७ हजार ४०४ झाली आहे.

चिंता वाढतेय..जळगाव जिल्ह्यात दिवसभरात तब्बल पाच मृत्यू 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा जून, जुलैच्या स्थितीची पुनरावृत्ती होताना दिसतेय. बुधवारी (ता. ३) दिवसभरात तब्बल पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली, तर नवे ३३६ रुग्ण समोर आले. यापैकी निम्म्याहून अधिक जळगाव शहरातील आहेत. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. रोज तीन, चारशेवर रुग्ण समोर येत आहेत. बुधवारचा दिवस चिंता वाढविणारा ठरला. गेल्या २४ तासांत तब्बल पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३३६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण आकडा ६२ हजार १०२ झाला आहे. दिवसभरात १५२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्यांची संख्या ५७ हजार ४०४ झाली आहे. मंगळवारपेक्षा बुधवारची रुग्णसंख्या कमी असली, तरी बुधवारी केवळ सुमारे २१०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. 
 
जळगाव शहरात भीषण स्थिती 
रोजप्रमाणे बुधवारीही जळगाव शहरातील रुग्णसंख्या निम्म्यापेक्षा अधिक होती. बुधवारी आढळून आलेल्या ३३६ पैकी शहरातील रुग्ण तब्बल १६९ आहेत. चोपडा तालुक्यात ५१, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १२, अमळनेर ३, पाचोरा व भडगाव तालुका प्रत्येकी २, धरणगाव १६, यावल ८, एरंडोल ३, जामनेर ५, रावेर ५, पारोळा ९, चाळीसगाव २३, मुक्ताईनगर ९, बोदवड २, अन्य जिल्ह्यातील ३ असे रुग्ण आढळले. 

लसीकरणाने ओलांडला २५ हजारांचा टप्पा 
जिल्ह्यात लसीकरणाच्या मोहिमेने आता २५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी दिवसभरात एक हजार १११ जणांना लस दिली. एकूण २५ हजार १४० जणांना लस देण्यात आली आहे, तर लसीचा दुसरा डोस १९७ जणांनी घेतला. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या चार हजार ४६७ झाली आहे.